india_pakistan.jpg Sakal
ग्लोबल

'मदरश्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देतंय'

१९५६ नंतर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धार्मिक संतुलन बिघडवण्यास सुरूवात केली.

सकाळ डिजिटल टीम

मदरश्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. तिथे साधारण ४० हजार मदरसे आहेत, जिथून दरवर्षी मोठ्या संख्येने आतंकवादी तयार होतात. फक्त एवढंच नव्हे तर पाकिस्तानची काश्मीर निती अजूनही सैन्याच्याच नियंत्रणाखाली आहे आणि हेच कारण आहे की, पाकिस्तानातली कोणतीही तज्ज्ञ व्यक्ती दहशतवाद संपवण्याविषयी बोलत नाहीये, असा दावा अमेरिकी थिंकटँकच्या बाल्टिमोर पोस्ट एक्झामिनरने आपल्या नव्या अहवालामध्ये केला आहे.

या अहवालात असंही म्हटलं आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीख यांचं विधान हे सैन्याला खूश करण्यासाठी पाठ करून केलेलं विधान आहे. शरीफ म्हणाले होते की आम्हाला भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. पण शांतता ही काश्मीर वादावर तोडगा निघाल्याशिवाय शक्य नाही.

अहवालानुसार, पाकिस्तान हा कृषीप्रधान देश आहे, ज्याच्या पश्चिमी भागात लागणारं दोन तृतीयांश पाणी काश्मीरच्या नद्यांमधून येतं. पण त्यांनी कायद्यांचं पालन करण्याऐजी काश्मीरचा ताबा घेण्याची नीती अवलंबली आहे. या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्ताला गिलगिट आणि इतर दोन भागांमधून माघार घेण्यास सांगितलं होतं. पण पाकिस्तानने याबाबतीत काहीही ऐकलं नाही. त्यानंतर १९५६ नंतर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धार्मिक संतुलन बिघडवण्यास सुरूवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT