

Rohit Sharma Promises 6th IPL Title
Sakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
इंडियन्स प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. संघही सध्या अंतिम तयारीला लागले आहेत. यादरम्यान, फ्रँचायझींचे काही खास कार्यक्रमही होत आहेत. नुकताच शनिवारी (२१ मार्च) मुंबई इंडियन्सचा कार्यक्रम झाला.
यावेळी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या देखील उपस्थित होता. तसेच मुंबई इंडियन्समधील सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडूही हजर होते. यावेळी रोहितने चाहत्यांना ६ व्या आयपीएल ट्रॉफीसाठी प्रयत्न असेल, असा शब्दही दिला.