Imran Khan 
ग्लोबल

Pakistan : लाहोर उच्च न्यायालयाचा इम्रान खान यांना दिलासा; पुढील आदेशापर्यंत कारवाईला स्थगिती

सकाळ डिजिटल टीम

लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोर उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पीटीआय समर्थक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा यांच्यात दिवसभर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लाहोर उच्च न्यायालयाने बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत पोलिसांच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लाहोरमधील इम्रान खान यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी माघार घेण्यास सुरुवात केली. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या कार्यकर्त्यांनी याचा आनंद साजरा केला. यावेळी इम्रान खान यांनी पीटीआय समर्थकांची भेट घेतली. पीटीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

तत्पूर्वी इम्रान खान यांना अटक करण्यासाठी लाहोर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अनेक तास प्रयत्न करूनही पाकिस्तानी पोलिसांना इम्रान खान यांना अटक करता आली नाही. इम्रानला अटक करण्यासाठी पोलिसांना तब्बल २४ तास धडपड करावी लागली, पण तरीही पीटीआय समर्थकांच्या गोंधळामुळे ते शक्य झाले नाही.

दरम्यान, पोलीस माघारी परतल्यानंतर पीटीआय समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. लाहोरमध्ये जमान पार्कबाहेर कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी जमले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT