ग्लोबल

भारताचं मिसाईल पडलं पाकमध्ये; खेद व्यक्त करुनही संयुक्त तपासाची मागणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पाकिस्तानने काल शनिवारी म्हटलंय की, आमच्या पंजाब प्रांतात पडलेल्या मिसाईलमुळे झालेल्या नुकसानीबााबत भारताने दिलेल्या सरळसोट स्पष्टीकरणामुळे ते समाधानी नाहीये. या घटनेची सखोल चौकशी होण्यासाठी तसेच संबंधित तथ्यांचा योग्य शोध घेण्यासाठी संयुक्त चौकशीची मागणी पाकिस्तानने केली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, पाकिस्ताने भारताच्या माहिती कार्यालयाकडून आलेल्या वक्तव्याचा अभ्यास केला आहे. यामध्ये भारताने ९ मार्च रोजी पाकिस्तानी भागामध्ये पडलेल्या भारतीय मिसाईलमधील तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच एका उच्च स्तरिय कोर्ट ऑफ इन्क्वायरीची मागणी केली आाहे.

पाकिस्तानने भारताच्या उपराजदूतांना शुक्रवारी आपला तीव्र निषेध व्यक्त करत म्हटलंय की, कसल्याही प्रकारे न उकसवता भारतीय मिसाईलकडून त्यांच्या वायुक्षेत्राचं उल्लंघन करण्यात आलंय. पुढे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी शुक्रवारी भारताच्या या कृतीबाबत तसेच मिसाईल्स सारख्या तांत्रिक बाजू सांभाळण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करत म्हटलंय की, या घटनेबाबत भारताने पाकिस्तानला माहिती देखील दिली नाही. अनधिकृत मिसाईल प्रक्षेपणाच्या विरोधात सुरक्षा प्रोटोकॉलचे हे थेट उल्लंघन आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, या प्रकारच्या गंभीर प्रकरणी भारतीय अधिकाऱ्यांकडून निव्वळ सरळसोट स्पष्टीकरणाने आमचं समाधान होऊ शकणार नाही. आमच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली गेली पाहिजेत. पाकिस्तान या घटनेशी निगडीत बाबींचा शोध घेण्यासाठी संयुक्त तपासाची मागणमी करत आहे.

नेमकं काय घडलंय?

पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी असा आरोप केला होताा की, एक तीव्र गतीने उडणारी एक वस्तू पाकिस्तानमधील मियां चन्नू भागामध्ये परवा बुधवारी येऊन क्रॅश झाली आहे. यामुळे नागरिकांच्या काही मालमत्तांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जरनल बाबर इफ्तेखार यांनी म्हटलं होतं की, हे फ्लाईंग ऑब्जेक्ट भारताकडून लाँच करण्यात आलंय आणि खाली पडण्याआधी ते जवळपास तीन मिनिटे हवेमध्ये होतं. त्यांनी म्हटलंय की,पाकिस्तानमध्ये पडण्याआधी त्याने जवळपास 260 किमीचं अंतर पार केलंय. पाकिस्तानी मीडिया हे ऑब्जेक्ट म्हणजे मिसाईल असल्याचं सांगितलं होतं. भारतानेही आपली चूक मान्य केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT