pakistan terrorist khyber pakhtunkhwa province of pakistan 6 barbers killed punjab kidnap Sakal
ग्लोबल

Islamabad News : अपहृत नाभिकांची हत्या; पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वातील घटना

सहा नाभिकांचे अपहरण करून त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आज उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : सहा नाभिकांचे अपहरण करून त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आज उघडकीस आली. त्यांचे एक दिवस अगोदर पंजाब प्रांतातून अपहरण करण्यात आले होते.

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील मीर अली भागात हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अपहृत नाभिक हे पंजाब प्रांतातील स्थानिक बाजारात केशकर्तनालय चालवत होते. त्यांचे काल अपहरण करण्यात आले. मात्र ते बेपत्ता झाल्याची माहिती कळाल्यानंतर तपास सुरू असताना रात्री उशिरा त्यांचे मृतदेह आढळून आले. या हत्येची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

या सहा जणांना गोळ्या घालून ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. बान्नू प्रांतीय पोलिस अधिकारी कासीम अली खान म्हणाले, सहा जणांचे मृतदेह मोसाकी भागात आढळून आले.

मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यापैकी एकाकडे संगणकीय ओळखपत्र सापडले असून तो डेरा गाझी खानचा रहिवासी असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी पाच मजूरांची हत्या केल्याची घटना घडली होती.

ते मजूर तंबूत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी दुसरी घटना उघडकीस आली. दरम्यान, खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT