Pakistan Tested Missile Ghaznavi
Pakistan Tested Missile Ghaznavi  
ग्लोबल

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; गझनवी क्षेपणास्त्राची केली पुन्हा चाचणी

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : अर्थव्यवस्था खड्ड्यात गेलेल्या पाकिस्तानला भारतासोबत युद्धाची खुमखुमी आली आहे. त्यामुळे काल रात्री पाकिस्तानात क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णय भारताने घेतल्यानंतर पाकिस्तानाच तीळपापड झाला आहे.

कराचीजवळच्या सोनीमनी या ठिकाणी चाचणीच्या क्षेत्रात लष्करी सराव होणार असल्याची सूचना यापूर्वीच देण्यात आली होती. आज (ता. 29) पहाटे 4:40 ते 9च्या दरम्यान ही चाचणी करण्यात आली. काल (ता. 28) या चाचणीमुळेच कराचीला जाणारे तीन हवाई मार्ग बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला होता. 

पाकिस्तानने भारताशी सगळे आर्थिक संबंध तोडले आहेत. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारता विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात त्याला अपयश आलंय. त्यांच्या संसदेत या मुद्द्यांवर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोणत्याही पातळीवर भारताविरोधात यश येत नसल्याने पाकिस्तानने आता त्यांच्या गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करून, भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. या क्षेत्रपणास्त्राची चाचणी केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले असून, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाकिस्तानची ही क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे भारताला धमकी देण्याचा प्रकार असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानात बुधवारी रात्री ही चाचणी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजी आईएसपीआर या संस्थेने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. जमिनीवर 290 किलोमीटर मारक क्षमता असलेले हे क्षेपमास्त्र असून, पाकिस्तानच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या चाचणीबद्दल संशोधनकांचे अभिनंदन केल्याचेही ट्विटमध्ये म्हटले आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. सीमेवरही पाकिस्तानने कुरघोड्या सुरू केल्या असून, काही दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याची तयारी चालवल्याचीही माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT