pakistan tik tik girl hareem shahs foreign office video viral 
ग्लोबल

Video: पाक सरकार व इम्रान खानची उडवली खिल्ली...

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका Tik Tok युवतीच्या व्हिडिओमुळे पाकिस्तान सरकार व पंतप्रधान इम्रान खान यांची खिल्ली उडवली जात आहे. शिवाय, पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे तिने वाभाडे काढले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हरीम शाह या Tik Tok युवतीने प्रवेश केला. शिवाय, परराष्ट्र मंत्रालयातील कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन तिने व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तान सरकार आणि पंतप्रधान इम्रान खान यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. युवतीने परराष्ट्र मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर फोटो काढले. हिंदी गाण्यांवर टीक टॉक व्हिडिओ तयार केला. एवढेच नाही तर पंतप्रधान इम्रान खान ज्या खुर्चीवर बसतात चक्क त्या खुर्चीत बसून व्हिडिओ करत असल्याचेही दिसत आहे.

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी पाकिस्तान सरकार व इम्रान खान यांना ट्रोल केले आहे. पण, परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घेऊन प्रवेश केल्याचे हरीमने सांगितले. नियमांविरोधात असेल तर अधिकाऱ्यांनी परवानगीच कशी दिली? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT