Pak_Corona_Vaccine 
ग्लोबल

'एक डोस घ्या अन् कोरोनाला पळवा'; पाकिस्तान बनवणार स्वदेशी लस

वृत्तसंस्था

Corona Updates: इस्लामाबाद : जगभरातील जवळपास सर्वच देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. पाकिस्तानलाही याचा फटका बसला आहे. शेजारील तसेच मित्र राष्ट्रांकडून कोरोना लसी घेऊन लसीकरण मोहीम राबविणाऱ्या पाकिस्तानने एक मोठा दावा केला आहे. फक्त एकाच डोसमध्ये कोरोनाला प्रतिबंध घालणारी लस तयार करण्यात येणार असून यासाठी चीनची मदत घेतली जाणार आहे. 

पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल असेंब्लीच्या पॅनेलला एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानची राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) लवकरच स्वतःची कोरोना लस तयार करणार आहे. ज्याचा फक्त एकच डोस कोरोनाबाधितांना घ्यावा लागणार आहे. ही लस चीनची कॅन्सिनोबायो (CansinoBio) असेल आणि पाकिस्तान ही लस तयार करण्यासाठी चीनच्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. पाकिस्तानने यासाठी क्लिनिकल ट्रायलही घेतल्या आहे. 

NIHचे कार्यकारी संचालक मेजर जनरल आमीर इकराम यांनी म्हटले आहे की, चीनकडून लसीचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची विनंती पाकिस्तानने केली आहे. या लसीसाठी कच्चा माल या महिन्यात पाकिस्तानमध्ये येणार आहे. त्याआधीच चीनची एक टीम पाकिस्तानात दाखल झाली आहे.

दरम्यान, पाकिस्तानने यावर्षी ३ फेब्रुवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात केली. चीनने दिलेल्या ५ लाख कोरोना लसींच्या आधारे हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. ग्लोबल अलायन्स फॉर वैक्सीन अॅण्ड इम्युनायजेशन (GAVI)च्या माध्यमांतून पाकिस्तानला भारताने तयार केलेली वॅक्सीनही मिळणार आहे. जूनपर्यंत पाकिस्तानला १.६ कोटी कोरोना प्रतिबंधक लसी मिळणे अपेक्षित आहे. 

वर्ल्डोमीटरवरील आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या ७ लाख ३४ हजार ४२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ हजार ७५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या कमी असल्याने तेथील रुग्णसंख्याही कमी असल्याचे दिसून येते. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT