yahya khan 
ग्लोबल

पाकिस्तानच्या याहया खानने केला होता 30 लाख बांगलादेशींचा 'नरसंहार'

सकाळ ऑनलाईन

बंगबंधु शेख मुजिब-उर-रहमानच्या नेतृत्वातील बांगलादेश मुक्ती वाहिनीने भारतीय सैन्याच्या मदतीने पाकिस्तानचा क्रूर हुकुमशहा याहया खान यांच्या इराद्यांवर मात करत आजच्याच दिवशी 1971 मध्ये विजय प्राप्त केला होता. बांगलादेशमध्ये जनरल याहया खान आणि त्यांच्या पाकिस्तानी सैन्याने क्रूरतेने जवळजवळ 30 लाख लोकांचा नरसंहार केला होता. पाकिस्तानने यासाठी अजूनही बांगलादेशची माफी मागितलेली नाही. 

पाकिस्तानी सैन्याने त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानवर 25 मार्च 1971 मध्ये रात्री अचानक हल्ला केला, त्यानंतर युद्ध सुरु झाले आणि 16 डिसेंबरला हे युद्ध संपले. शेख हसिना यांनी 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रात याबाबत आवाज उठवला होता. इम्रान सरकारने याबाबत बांगलादेशची माफी मागावी, असं त्या म्हणाल्या होत्या. अधिकृतरित्या 9 महिने चाललेल्या युद्धात 30 लाखांपेक्षा अधिक नागरिक मारले गेले होते. 

iPhone आणि Android वापरणाऱ्यांनो, 2021 पासून या फोन्सवर व्हॉट्सऍप होणार बंद!

पाकिस्तानसोबत सुरु असणाऱ्या 9 महिन्याच्या मुक्तीसंग्रामात 30 लाख निर्दोष लोकांना मारण्यात आले होते. याहया खान याच्या सैन्याने 20,000 पेक्षा अधिक महिलांचे शोषण केले होते. बुद्धीजीवींची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. बंगबंधूंच्या नेतृत्वात सुरु झालेल्या विद्रोहात पाकिस्तानने बुद्धिजीवींची हत्या केली. याअंतर्गत लेखक, शिक्षक, डॉक्टर आणि वैज्ञानिकांना मारण्यात आले. 

याहया खान दारु आणि महिलांचा शौकिन होता. बीबीसीच्या रिपोर्टनुसार याहया खानला लेडीज मॅन म्हटलं जायचं. खान रात्री 8 वाजता दारु पिण्यास बसायचा आणि 10 वाजेपर्यंत बेधुंद व्हायचा. याच कारणामुळे रात्री 10 च्यानंतर त्याच्या आदेशाचे पालन व्हायचे नाही. 

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी मंगळवारी देशात धार्मिक कट्टरता वाढण्याची शक्यता व्यक्त केली. 50 व्या मुक्ती दिवसाच्या पार्श्वभूमीवर शेख हसिना म्हणाल्या की धर्माच्या नावावर देशात अराजकता पसरवू देणार नाही. काही नेते आज लोकांना भ्रमित करत आहे आणि देशात अशांतता पसरवू पाहात आहेत. पण बांगलादेश हा धार्मिक देश आहे, पण धर्मांध नाही, असं त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळ टोळीतील मुसाब शेखला अटक; शेखच्या ताब्यातून ८७८ ग्रॅम गांजा जप्त, अन्य एकजण ताब्यात

Pune Crime : पुण्यातील घरफोडीप्रकरणी सराईत गुन्हेगार २४ तासांत अटकेत

Latest Marathi News Live Update : सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारला फटकार

Pune Crime : मकोका गुन्ह्यातील फरार आरोपी करण कुंभार गजाआड

Pune Books On Wheel : ‘एनबीटी’च्या फिरत्या पुस्तक बसचे उद्‍घाटन; वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी उपक्रम

SCROLL FOR NEXT