Pakistans penniless billionaires expose money laundering frenzy
Pakistans penniless billionaires expose money laundering frenzy 
ग्लोबल

रिक्षाचालकाच्या खात्यातून 2.25 कोटी डॉलरचे व्यवहार

वृत्तसंस्था

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील एका रिक्षाचालकाच्या बॅंक खात्यातून तब्बल 2.25 कोटी डॉलर (सुमारे तीन अब्ज पाकिस्तानी रुपये) व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुलीला सायकल घेण्यासाठी वर्षभरात मुश्‍किलीने 300 रुपये जमविणारा रिक्षाचालक मोहमद राशिद याच्या खात्यातून एवढ्या प्रचंड रकमेचे व्यवहार होणे हा "मनी लॉंडरिंग'चा प्रकार असल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तानमध्ये खातेदारांना अंधारात ठेवून त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. अशा प्रकारचा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याचा व देशाबाहेर पाठविलेले अब्जावधी रुपये पुन्हा आणण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. सरकारने असा दावा केला असला, तरी "मनी लॉंडरिंग'च्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. आइस्क्रीम विक्रेता मोहंमद कादिर (वय 52) यांनाही असाच अनुभव आलेला आहे. कादिर म्हणाले, की मी कधी बॅंकेत जाऊन चौकशी केली नाही; पण जेव्हापासून ही घटना उघडकीस आली आहे, तेव्हापासून शेजारी माझी चेष्टा करतात. अब्जावधी पैशांचा मालक समजून कोणी गुन्हेगार माझे अपहरण करतील, अशी मला सतत भीती वाटते, असेही ते म्हणाले.

बनावट खात्यांतून 40 कोटी डॉलरचे व्यवहार
पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या आयोगानुसार बनावट बॅंक खात्यांच्या माध्यमातून किमान 40 कोटी डॉलरचे व्यवहार झाले आहेत. यात सुमारे 600 कंपन्या आणि अनेक लोकांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT