![Delhi Hospital Fire](http://media.assettype.com/esakal%2F2024-05%2F12d67d42-8131-4e5f-b17c-668295be4b6f%2FDelhi_Hospital_Fire.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
दिल्लीतील बेबी केअर हॉस्पिटलच्या मालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.नवीन खिची असे त्यांचे नाव आहे. नवीन खिची हा दुर्घटना झाल्यापासून फरार असल्याचे सांगण्यात येत होते पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर उपचारादरम्यान नवजात बालकाला इजा केल्याचा आरोप आहे आणि त्याच्याकडे रुग्णालय चालवण्याची एनओसीही नव्हती. पोलीस सध्या नवीन खिचीची चौकशी करून प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. विवेक विहारमध्ये असलेल्या बेबी केअर रुग्णालयाशिवाय इतरही अनेक रुग्णालये होती जिथे फक्त मुलांवर उपचार केले जात होते.
विवेक विहार येथील बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास आग लागली. आग एवढी भीषण होती की काही वेळातच ती आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि इतर स्थानिक लोकांसह रुग्णालयात उपस्थित असलेल्या 12 मुलांना बाहेर काढण्यात यश आले. या मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी ६ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, अधिकाऱ्यांकडे एनओसी नसण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी नवीन खिची याच्याविरुद्ध विवेक विहार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे कृत्य) आणि ३०४ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर नवीन हा फरार होता. मात्र आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हॉस्पिटलमध्ये काही ऑक्सिजन सिलिंडर असल्याने स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, रात्री 11.32 वाजता आम्हाला बेबी केअर हॉस्पिटलमध्ये आग लागल्याचा फोन आला. आम्ही सुरुवातीला सात अग्निशमन दल पाठवले आणि नंतर आणखी पाच. आम्ही 12 मुलांना वाचवले. नंतर आम्हाला कळले की तिथे लहान मुले होती आणि सुमारे सहा मुले मरण पावली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.