Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Income Tax Raid: सराफी व्यावसायिकाच्या घरझडतीमध्ये शोभेच्या फर्निचरच्या सेफमध्ये नोटांची बंडले दडविण्यात आल्याचे आढळून आले असून २६ कोटींची रोकड मोजण्यासाठी तब्बल १८ तास लागले.
Income Tax Raid
Income Tax RaidEsakal

नाशिक: अजय देवगन अभिनित ‘रेड’ या चित्रपटाचीच पुनरावृत्ती नाशिकमध्ये प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुभवयास मिळाली. सराफी व्यावसायिकाच्या घरझडतीमध्ये शोभेच्या फर्निचरच्या सेफमध्ये नोटांची बंडले दडविण्यात आल्याचे आढळून आले असून २६ कोटींची रोकड मोजण्यासाठी तब्बल १८ तास लागले. एकूण ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ताही प्राप्तीकर विभागाच्या हाती लागली आहे. गेल्या वर्षीही शहरातील काही सराफांच्या दुकानांवर प्राप्तीकर विभागाने छापा टाकत कारवाई केली होती, परंतु त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात हाती लागले नव्हते.

नाशिकसह जळगाव आणि नागपूर येथील प्राप्तीकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.२४) शहरातील काही सराफ व्यावसायिकांवर छापा टाकत कारवाई सुरू केली होती. प्रारंभी, करचुकवेगिरीमुळे प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केल्याचे सांगितले जात होते.

शनिवारी (ता.२५) प्राप्तीकर विभागाच्या पथकाने मनमाड आणि नाशिकमधील सुराणा सराफ व्यावसायिकाच्या दालनांसह त्याच्या घरांवर छापामारी केली. प्राप्तीकरचे विभागीय महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमध्ये ५५ प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करीत रोकड आणि बेहिशोबी मालमत्तांची कागदपत्रे शोधून काढली आहेत.

Income Tax Raid
Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

नोटा मोजायला लागले १६ तास

सुराणा ज्वेलर्सवर टाकलेल्या धाडीतून २६ कोटींची रोकड हाती लागली आहे. यातील १५ कोटींची रोकड ही शोभेच्या फर्निचरच्या सेफमध्ये सापडली आहे. अत्यंत शिताफीने हे शोभेचे फर्निचर बनविण्यात येऊन त्यात ही रोकड दडविण्यात आलेली होती. अधिकाऱ्यांनी जेव्हा या फर्निचरची तपासणी केली असता, त्यांना संशय बळावला. फर्निचर तोडले असता, त्यातून १५ कोटींची रोकड पथकाच्या हाती लागली. तर, ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल १४ ते १६ तासांचा कालावधी लागला. मालमत्तेचा शोध घेत असताना पथकाच्या हाती तब्बल ९० कोटींची बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रे लागली आहे. पथकाच्या या कारवाईमुळे सुराणा ज्वेलर्समधील सुवर्णच हाती लागले आहे.

Income Tax Raid
Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

असा बळावला संशय

कस्टम विभागाकडून काही महिन्यांपूर्वी विमानतळांवर सोने तस्करला जेरबंद केले होते. त्या चौकशीतून सोन्याची नाशिकमध्ये विक्री केल्याचे समोर आले होते. त्याच चौकशीतून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या सराफी व्यावसायिकांच्या मनमाड आणि नांदगाव येथील नातलगांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली आहे.

Income Tax Raid
Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

- २६ कोटींची रोकड जप्त

- रोकड सर्व ५०० रुपयांच्या चलनात

- ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता

- रोकड मोजण्यासाठी ७ मशिन्सचा वापर

- १४ ते १६ तास नोटांची मोजणी

- ५५ अधिकाऱ्याचा ताफा

- नाशिकसह मनमाड, नांदगावमध्ये कारवाई

Income Tax Raid
Swati Maliwal Assault Case : मालीवाल मारहाण झाली 'त्या' दिवशी तक्रार न देता पोलिस स्टेशनमधून का परतल्या? स्वतःच सांगितलं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com