Imran khan Sakal
ग्लोबल

पाकची आडकाठी दूर, अफगाणिस्तानात पोहोचणार भारताचा गहू

सकाळ डिजिटल टीम

वाघा बॉर्डरमार्गे भारतातून अफगाणिस्तानला मदत म्हणून ५० हजार मेट्रिक टन गहू आणि जीवनावश्यक साहित्य, औषधे पाठवण्यात येणार आहे.

अफगाणिस्तानला (Afghanistan) भारतातून (India) गहू आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पाकिस्तानने (Pakistan) थोडी अडेलतट्टू अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, आता काही अटींवर पाकिस्तानने भारतातून ट्रक नेण्यास परवानगी दिली आहे. याची माहिती भारताच्या परराष्ट्र खात्याला देण्यात आली आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून अपवादात्मक परिस्थितीत वाघा सीमेवरून (Wagah Border) तोरखामपर्यंत वाहतुकीसाठी अफगाण ट्रक वापरून वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. वाघा बॉर्डरमार्गे भारतातून अफगाणिस्तानला ५० हजार मेट्रिक टन गहू आणि जीवनावश्यक साहित्य, औषधे पाठवण्यात येणार आहे.

अफगाणिस्तानला भारतातून गहू आणि इतर साहित्य पाठवण्याबाबत परवानगी देण्याचा हा निर्णय पाकिस्तानने भारताच्या परराष्ट्र खात्याला कळवला आहे. आता भारताने अफगाणिस्ताला मदत पोहोचवण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत आणि मदत पोहोचवावी असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.

पाकिस्तानने आधी भारतातून वाघा बॉर्डरमार्गे भारतीय किंवा अफगाणिस्तानच्या ट्रकमधून नेण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. भारत जो प्रस्ताव मान्यच होणार नाही असा प्रस्ताव देऊन आपली पावले मागे घेत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता.

भारताने ७ ऑक्टोबरला ५० हजार टन गहू, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे अफगाणिस्तानला मानवतावादी दृष्टीकोनातून मदत म्हणून पाठवण्याची घोषणा केली होती. मदत पाकिस्तानमार्गे पाठवण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला पत्र लिहिलं होतं. यावर उत्तर देताना सुरुवातीला पाकिस्तानने म्हटलं होतं की, भारतातील ट्रक वाघा बॉर्डरवर त्यातील माल उतरतील, तिथून पाकिस्तानच्या ट्रकमध्ये माल लादून तो अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT