Pampa Sharing
Pampa Sharing Sakal
ग्लोबल

तिबेटच्या अध्यक्षपदी पेंपा सेरिंग

सकाळ वृत्तसेवा

धरमशाला - तिबेटच्या (Tibet) केंद्रीय प्रशासनाच्या अध्यक्षपदी पेंपा सेरिंग (Pampa Sharing) यांचा गुरुवारी शपथविधी (Auth) झाला. विजनवासातील हे सरकार धरमशालामधून कार्यरत आहे. (Pampa Sharing as President of Tibet)

१७ व्या संसदेचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते दुसरे अध्यक्ष (सिक्योंग) आहेत. मुख्य न्याय आयुक्त सोनम नोर्बू दाग्पो यांनी पेंपा यांना शपथ दिली. पेंपा यांनी लोब्सांग सांगाय यांची जागा घेतली. शपथविधी सोहळा आटोपशीर झाला. त्यावेळी कोरोना निर्बंधांचे पालन करण्यात आले होते.

पेंपा यांनी सांगितले की, आपल्या अस्तित्व धोक्यात आलेल्या तिबेटसमोरील महत्त्वाच्या आव्हानांचा सामना आणि तिबेटी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याची आपल्या मंत्रिमंडळाची (कशाग) मुख्य जबाबदारी राहील.

दलाई लामांची व्हर्च्युअल उपस्थिती

तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा शपथविधी समारंभाला व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते. त्यांना नव्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. दलाई लामा हे पेंपा यांचे आदर्श आहेत.दलाई लामा यांच्या मार्गदर्शनानुसार पालन करणे सर्व तिबेटी बांधवांसाठी सर्वोच्च महत्त्वाचे आहे, असे सांगून ते म्हणाले की, परमपूज्य दलाई लामा यांचा आशीर्वाद व्हर्च्युअल उपस्थितीद्वारे लाभण्यात मी फार भाग्यवान आहे. त्यांना दाखविलेल्या मार्गावर आपली वाटचाल व्हावी म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

आधी संसदेचे सभापती

पेंपा ५३ वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी संसदेचे सभापतिपद भूषविले आहे. २००८ ते २०१६ दरम्यान त्यांनी दोन कार्यकाळांत या पदाची जबाबदारी पार पाडली. २०१६ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या वर्षातील निवडणूकीसाठी त्यांनी गेल्या वर्षी तीन सप्टेंबर रोजी उमेदवारी जाहीर केली. पेंपा यांना ३४ हजार ३२४ मते मिळाली. दुसरे उमेदवार कायडोर औकात्सांग (केल्सांग जोर्दी औकात्सांग) यांच्यापेक्षा त्यांना पाच हजार ४१७ मते जास्त मिळाली.

बंधू-भगिनींना शुभेच्छा

स्वातंत्र्य आणि सत्येवर प्रेम करणाऱ्या तिबेटबाहेरील आपल्या बंधू-भगिनींना पेंपा शुभेच्छा दिल्या. तिबेटचे संसदीय मित्र, तिबेटला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तींविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT