Panda Dogs in Zoo eSakal
ग्लोबल

Panda Dogs in Zoo : प्राणीसंग्रहालयात नव्हते पांडा म्हणून चक्क कुत्र्यांनाच दिला ब्लॅक अँड व्हाईट रंग; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या श्वानांना प्राणीसंग्रहालय प्रशासन 'पांडा डॉग्स' असं म्हणत आहे. हे डॉग्स नक्कीच क्यूट आणि मनोरंजक आहेत.

Sudesh

China Zoo Panda Dogs : चीनमधील एका प्राणीसंग्रहालयातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या प्राणीसंग्रहालायत पांडा म्हणून चक्क श्वानांना रंग देऊन पिंजऱ्यात ठेवण्यात आलेलं समोर आलं. यानंतर सोशल मीडियामध्ये याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या झूमध्ये चाऊ-चाऊ जातीच्या श्वानांना पांडा म्हणून सादर केलं जात होतं. या श्वानांना प्राणीसंग्रहालय प्रशासन 'पांडा डॉग्स' असं म्हणत आहे. हे डॉग्स नक्कीच क्यूट आणि मनोरंजक आहेत. मात्र, यामुळे कित्येक लोक नाराज देखील झाले आहेत. ही झू पहायला आलेल्या प्रेक्षकांची फसवणूक आहे; तसंच श्वानांवर देखील अत्याचार होत असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.

या प्राणीसंग्रहालयाने Chow Chow श्वानांचे केस अशा प्रकारे कापले आहेत, की ते लांबून पांडाप्रमाणे गोलू-मोलू दिसतील. त्यानंतर त्यांनी या श्वानांना पांडा प्रमाणेच ब्लॅक अँड व्हाईट रंग दिला. मात्र तरीही त्यांची हालचाल आणि भुंकणं यामुळे ते पांडा नसल्याचं लगेच दिसून येत आहे.

प्रशासन निर्णयावर ठाम

प्राणीसंग्रहालय प्रशासनाने मात्र आपल्या या निर्णयाची पाठराखण केली आहे. "आमच्याकडे पांडा नाहीत म्हणून आम्ही ही शक्कल लढवली आहे. श्वानांना रंग देण्याबद्दल देखील काही अडचण नसावी. आपण स्वतः देखील हेअर डाय करतोच. नैसर्गिक रंग वापरून श्वानांना देखील रंग दिला जाऊ शकतो.." असं प्राणीसंग्रहालायाच्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT