Papua New Guinea conferred the Companion of the Order of Logohu to PM Narendra Modi  
ग्लोबल

PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!

सकाळ डिजिटल टीम

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी या देशाच्या दौऱ्यावर आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान PM मोदी यांच्या संन्मानांचा धडाका लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी त्यांना 'कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी' हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे.

यानंतर आता लगेचच पापुआ न्यू गिनीने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' (Companion of the Order of Logohu) हा पुरस्कार प्रदान केला आहे.

पंतप्रधान मोदी यांना पॅसिफिक बेटांच्या देशांच्या एकतेसाठी आणि ग्लोबल साउथचे नेतृत्व केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' हा पुरस्कार प्रदान केला. पापुआ न्यू गिनीतील फार कमी अनिवासींना हा पुरस्कार मिळाला आहे.

याआधी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. जेम्स मारापे हे नरेंद्र मोदी यांच्या चक्क पाया पडल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.या घटनेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

Dr Babasaheb Ambedkar : 'या' मोठ्या घटनेनंतर डॉ. आंबेडकरांनी दिली होती रायगडाला ऐतिहासिक भेट, एक दिवस केला होता मुक्काम

"कॅन्सरचे उपचार सुरु असतानाही त्याने.." मराठी अभिनेत्याने उघड केली रमेश भाटकरांची अखेरची इच्छा; म्हणाले..

Leopard Entered Muktainagar : अवघ्या 5 फुटांवरून बिबट्यावर डागले दोन अचूक 'डॉट'; हातात काठी घेऊन स्वतः आमदार मैदानात, मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला कसं पकडलं?

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

SCROLL FOR NEXT