passangers jump in sea when know some corona patient on ferry video viral 
ग्लोबल

बोटीत कोरोनाग्रस्त असल्याचे समजले अन्...

वृत्तसंस्था

जकार्ता (इंडोनेशिया) : एका बोटीमधून 255 पर्यटक प्रवास करत होते. पण, बोटीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे समजले आणि प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. घाबरलेल्या प्रवाशांनी थेट समुद्रातच उड्या मारल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाची भिती नागरिकांमध्ये पसरली आहे. ही भिती किती आहे, हे या व्हिडिओमधून पाहायला मिळते. इंडोनेशियातील समुद्रात अशीच एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. बोर्नियोहून सुलावेसीकडे एक बोट 255 पर्यटकांसह समुद्रात गेली होती. तेंव्हा काही लोकांनी बोटीत कोरोनाग्रस्त असल्याचे समजल्यानंतर समुद्रात उड्या मारल्या, असे वृत्त 'डेली मेल'ने देताना व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, प्रवाशांनी समुद्रात उड्या मारल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी लाइफ जॅकेट टाकण्यात आली. या प्रकारानंतर इंडोनेशियाच्या प्रशासनाने बोटीला बंदरात थांबवण्यास परवानगी दिली. पाण्यात उड्या मारलेले लोक पोहोचतच समुद्राच्या किनाऱ्यावर आले.

इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, आम्ही लोकांना फक्त कोरोनाची चाचणी कऱण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. इंडोनेशियात कोरोनाचे जवळपास 3 हजार रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 240 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळेच प्रवास करणाऱ्यांची कडक तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT