ग्लोबल

कोरोनामुळे फिरले लोकांचे डोके; मानसिक आजारांच्या सुनामीचा धोका 

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - कामाचा व्याप आणि त्यामुळे येणारा ताणतणाव ही चाकरमाण्यांसाठी तशी रोजचीच गोष्ट ! पण कोरोनाचे संकट आल्यापासून या मानसिक समस्यांनी अधिकच तीव्र रूप धारण केले आहे. जगाचे आर्थिक नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेतील सर्वच घटकांच्या मानसिक स्वास्थ्यावर कोरोनाने जबर आघात केल्याचे मानसशास्त्रीय अभ्यासातून दिसून येते. अमेरिकी मानसशास्त्रीय संघटनेच्या अहवालातून काही धक्कादायक बाबीसमोर आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाहणीचे निष्कर्ष 
७० टक्के  - अमेरिकी नागरिकांना अर्थव्यवस्थेची चिंता 
६७ टक्के  - लोक संसर्गाचा सामना करण्याच्या सरकारी पद्धतीमुळे चिंतीत 
एक तृतीयांश  पेक्षाही अधिक  लोकांत नैराश्य 
५० टक्के   लोकच मानसिक  आरोग्यावर बोलतात 
पाचातील एकाच्या  आरोग्यावर विपरित परिणाम 
१८ टक्के  - लोकांना नैराश्य 
सहा महिन्यापूर्वी रोजगार  गेलेल्यांची अवस्था बिकट. 
कोरोनाचा सर्वाधिक ताण तरुणांवर 

परिणामासाठी वेळ लागणार 
कोरोनामुळे जगभर मानसिक आजारांची त्सुनामी येण्याची भीती काही अभ्यासकांनी व्यक्त केली असून कोरोनाचे नेमके मानसशास्त्रीय परिणाम काय असतील हे आताच सांगता येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सार्सच्या उद्रेकानंतर २००२-०४ मध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तेव्हाची स्थिती पाहता आता परिस्थिती आणखी बिकट होईल अशी भीती त्यांना वाटते आहे. 

रुग्णांमध्ये संभ्रम 
जोनाथन रॉजर्स या संशोधकाने कोरोनाच्या काळात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या साडेतीन हजार रुग्णांच्या मानसशास्त्रीय स्थितीचा अभ्यास केला असता त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था दिसून आली. त्यांच्या मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असावी अशी शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT