Keir Starmer  sakal
ग्लोबल

Keir Starmer : ब्रिटनमध्ये लोकांना बदल हवाय;नवे पंतप्रधान कीर स्टार्मर, प्रत्येकाची सेवा करणार

संसदीय निवडणुकीतील विजयानंतर लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात बदलांचे सूतोवाच करताना दिखाऊपणाचे राजकारण आता संपले असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : संसदीय निवडणुकीतील विजयानंतर लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात बदलांचे सूतोवाच करताना दिखाऊपणाचे राजकारण आता संपले असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. होलबोर्न आणि सेंट पॅनक्रासमधून विजयी झाल्यानंतर जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी विविध मुद्यांना स्पर्श केला.

ज्या लोकांनी मला मतदान केले नाही त्यांची देखील मी सेवा करणार असल्याचे स्टार्मर यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले. ‘‘ या क्षणापासून बदलाला सुरूवात झाली असून ही आपली लोकशाही, तुमचा समाज आणि तुमचे भविष्य आहे. तुम्ही मतदान करून स्वतःची जबाबदारी पार पाडली असून आता आमची काम करण्याची वेळ आहे,’’ असे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्ष मतदानाच्या काळामध्ये मदत करणारे कुटुंबीय आणि स्वतःच्या पत्नीचे देखील त्यांनी जाहीर आभार मानले.

भारतीयांचा दबदबा वाढला

यंदा ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीमध्ये भारतीयांचा प्रभाव दिसून आला. हाउस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहामध्ये भारतीय वंशाचे २६ उमेदवार निवडून आले आहेत. अनेकजण हे हुजूर पक्षाकडून देखील विजयी झाले आहेत. प्रीतकौर गील, तमनजीतसिंग धेसी, नावेंदू मिश्रा, नाडिया व्हिट्टोमे हे उमेदवार पुन्हा विजयी झाले आहेत. मजूर पक्षाकडून प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आणि विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये जस अठवाल, बॅग्गी शंकर, सत्वीर कौर, हरप्रीत उप्पल, वारिंदर जस्स, गुरिंदर जोसान, कनिष्का नारायण, सोनिया कुमार, सुरिना ब्रॅकेनब्रिज, किरिथ एंटविस्ले, जीवून सांधेर आणि सोजान जोसेफ यांचा समावेश आहे. लिबरल डेमोक्रॅट्सकडून मुनिरा विल्सन विजयी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT