pfizer vaccine Sakal
ग्लोबल

5 वर्षांपेक्षा कमी वयोगटाला लसीसाठी फायजरने मागितली परवानगी

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांना किती डोस द्यावे लागतील असा एक प्रश्न आहे. फायजरकडून सध्या तीन डोसची चाचणी केली जात आहे.

लहान मुलांच्या लसीसंदर्भात अमेरिकेत जोरदार हालचाली सुरु आहेत. फायजरने बुधवारी अमेरिकन सरकारकडे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लस देणं अधिकृत करण्याची मागणी केली आहे. जर याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला लहान मुलांना डोस देण्यास सुरुवात केली जाईल. फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनने फायजर आणि बायोएनटेक कंपनीच्या प्रोजेक्टआधी अर्ज करण्याची विनंती केली होती.

अमेरिकेत ५ वर्षांपेक्षा कमी वयाची जवळपास १९ मिलियन मुलं आहेत. हा गट लसीकरणासाठी योग्य नाही. मुलांच्या पालकांकडूनसुद्धा लसीकरणाची मागणी करत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे अनेक तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एफडीएच्या परवानगीनंतर प्रौढांना देण्यात येणाऱ्या लशीचा दहा टक्के भाग हा ६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना देण्यात येऊ शकतो.

फायजरने बुधवारी सांगितलं की, फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनकडे त्यांनी आपला डेटा जमा करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. लहान मुलांना किती डोस द्यावे लागतील असा एक प्रश्न आहे. फायजरकडून सध्या तीन डोसची चाचणी केली जात आहे. कारण दोन अतिरिक्ट डोस मुलांसाठी पुरेसे आहेत. चाचणीचा डेटा मार्च महिन्यापर्यंत हाती येईल. त्यामुळे एफडीए तोपर्यंत दोन डोस अधिकृत करण्याची शक्यता असून त्यानंतर तिसऱ्या डोसला मंजुरी दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT