PFizer 
ग्लोबल

Pfizer vaccination in Israel : लस घेऊनही तब्बल 12,000 कोरोनाबाधित

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना महासंकटाशी लढणासाठी आपत्कालीन परिस्थितीत लसीला मान्यता देऊन लसीकरण सुरु करणाऱ्या देशांमधील  पहिल्या काही देशांमध्ये इस्त्रालय हा देश होता. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वत: फायझर कंपनीची लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात केली होती. मात्र, आता इस्त्रायलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फायझर-बायोनटेकची लस घेतल्यानंतर 12,400 लोक कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. यापैकी 69 लोकांनी लसीचा दुसरा खुराक घेतला होता. 

इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने फायझर लसीच्या लसीकरणानंतर 189,000 लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या. यामधील 6.6 टक्के लोक हे कोरोना संक्रमित आढळले आहेत. कोरोना महामारीचे राष्ट्रीय समन्वयक नॅचमन ऍश यांनी म्हटलंय की, आधी जितका विचार केला त्याहून फायझरची लस कमी परिणामकारक आहे. 

19 डिसेंबर रोजी इस्त्रायलने कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात केली. यामध्ये वयस्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक चतुर्थांश नागरिकांना आतापर्यंत फायझरची लस दिली गेलीय. फायझरच्या या लसीचा पहिला खुराक जवळपास एक चतुर्थांश लोकांना दिला गेला असून यातील 3.5 टक्के लोकांना लसीचा दुसरा खुराक देखील देण्यात आला आहे. 

एका महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये आतापर्यंत 9 दशलक्ष लोकांपैकी 2.2 दशलक्ष लोकांना लस दिली गेली आहे.  तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या इस्त्रायल देशातील संक्रमणाची गती अजूनही जास्त आहे. जेंव्हापासून ही महामारी सुरु झालीय तेंव्हापासून आतापर्यंत पाच लाख लोक संक्रमित झाले आहेत. तर 4005 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Mumbai Tour: सचिन तेंडुलकरसोबत भेट ते प्रदर्शनीय सामना... लिओनेल मेस्सीच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एका क्लिकवर

Tips For JEE Main Preparation: 12वी बोर्ड परीक्षेसोबत JEE Main ची तयारी कशी करावी? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Latest Marathi News Live Update: १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात

Viral Video: खरा तो एकची धर्म ! महिलेने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सकाळी केलं असं काही... नेटकऱ्यांकडून होतेय प्रशंसा

IPL 2026 Auction पूर्वी मोठा 'खेला'! जो ऑलराऊंडर सर्वात महागडा ठरू शकतो, त्याची फक्त फलंदाज म्हणून नोंदणी; कुणी केला गेम?

SCROLL FOR NEXT