ग्लोबल

फ्राइड चिकनऐवजी तळलेला टॉवेल; ऑनलाइन अ‍ॅपमुळे उडाला गोंधळ

काय?? चिकनऐवजी मिळाला चक्क तळलेला टॉवेल

शर्वरी जोशी

अनेकदा स्वयंपाक करण्याचा किंवा घरच्या जेवणाचा कंटाळा आला की आपण लगेच हॉटेलमधून ऑर्डर करतो. सध्याच्या काळात बाहेरील खाद्यपदार्थांची डिलीव्हरी करणारे अनेक फूड डिलीव्हरी अ‍ॅप सुद्धा आहेत. मात्र, बऱ्याचदा कम्युनिकेशन गॅप किंवा अन्य काही कारणांमुळे ग्राहकांपर्यंत चुकीची ऑर्डर पोहोचवल्याचेही किस्से घडले आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक किस्सा चर्चिला जात आहे. फूड अ‍ॅपने चिकन फ्राय मागवणाऱ्या एका महिलेला प्रत्यक्षात मिळालेला पदार्थ हा थक्क करणारा आहे. (philippines-woman-shocked-by-deep-fried-towel-in-chicken-order-watch-viral-facebook-post)

फिलिपिन्स येथे राहणाऱ्या Alique Perez या महिलेने ऑनलाइन फूड अ‍ॅपच्या मदतीने फ्राइड चिकनची ऑर्डर दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तिला चिकनऐवजी चक्क फ्राइड टॉवेल (deep-fried-towel) देण्यात आला आहे. होय. ऐकतांना ही घटना कितीही विचित्र वाटत असली तरीदेखील या महिलेसोबत हा किस्सा घडला आहे. तिला चक्क फ्राइड टॉवेल, चिकन म्हणून देण्यात आला आहे. याविषयी या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

"मी माझ्या मुलासाठी चिकनची ऑर्डर दिली होती. पार्सल आल्यानंतर हे चिकन कट करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु, हे चिकन कट होणं अशक्य असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी हाताने कट करण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक प्रकार माझ्यासमोर आला. फ्राइड चिकनऐवजी मला फ्राइड टॉवेल देण्यात आला होता", असं Alique ने सांगितलं.

दरम्यान, Alique यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये खरंच फ्राइड चिकनऐवजी टॉवेल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी या कंपनीवर ताशेरे ओढले असून कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला Alique यांना दिला आहे. Alique यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात असून त्याला ८७ हजार शेअर आणि १ लाखापेक्षा जास्त रिअॅक्शन मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

SCROLL FOR NEXT