kidney  sakal
ग्लोबल

Pig Kidney Transplant: आता माणसात बसवता येणार डुकराची किडनी, अमेरिकेच्या डॉक्टरांचा यशस्वी प्रयोग...

अमेरिकेत डॉक्टरांनी डुकराची किडनी एका व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण केली आहे.

Aishwarya Musale

किडनी हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करण्याचे काम किडनी करते, त्यामुळे किडनी व्यवस्थित काम करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांची किडनी नीट काम करत नाही किंवा निकामी होत नाही अशा लोकांसाठी किडनी प्रत्यारोपण केले जाते.

नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते, यूएस मध्ये अंदाजे 40 दशलक्ष लोकांना मूत्रपिंडाचा आजार आहे आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत दररोज 17 लोकांचा मृत्यू होतो.

अमेरिकेतील डॉक्टरांनी डुकराची किडनी ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित केली, त्यानंतर धक्कादायक निष्कर्ष समोर आले. डॉक्टरांनी सांगितले की, प्रत्यारोपणाच्या महिनाभरानंतरही ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात डुकराची किडनी सामान्यपणे काम करत आहे. हे प्रत्यारोपण 14 जुलै 2023 रोजी करण्यात आले. त्यानंतर ते सामान्यपणे काम करत आहे.

संशोधकांनी सांगितले की त्याची चाचणी पुढील महिन्यातही सुरू राहणार आहे. NYU च्या संशोधन संघाचा असा विश्वास आहे की, 'यामुळे मानवी शरीराला रोगाविरूद्ध लढण्यासाठी प्राण्यांच्या अवयवांचा वापर करण्याची शक्यता वाढली आहे.

न्यूयॉर्कच्या मेडिकल टीमच्या म्हणण्यानुसार, 'झेनोट्रान्सप्लांट नावाची ही प्रायोगिक प्रक्रिया जीवघेण्या आजाराचा सामना करणार्‍या लोकांसाठी अवयवांचा पर्यायी पुरवठ्याचा संभाव्य वापर करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल आहे.'

NYU लँगोन हेल्थ यांनी बुधवारी सांगितले की प्रयोग दर्शवितो की डुकराची किडनी एखाद्या व्यक्तीमध्ये सर्वात जास्त काळ काम करते, जरी तो मेला असेल आणि हा प्रयोग अजून संपलेला नाही. संशोधक दुसऱ्या महिन्यात किडनीच्या कार्याचा मागोवा घेतील.

यापूर्वी रुग्ण केवळ ७२ तास जिवंत होता

अनेक वर्षांच्या अपयशानंतर यश मिळणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागच्या प्रयत्नात, ती व्यक्ती केवळ 72 तास जिवंत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT