PLA Tibet military command holds nighttime high-altitude drills 
ग्लोबल

तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीनचं चाललंय काय?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनला लागून असणाऱ्या सीमेवर सध्या तणावाची स्थिती आहे. भारत आणि चीनचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. अमेरिकेने चीनला कुटनीतिक मार्गाने या वादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. चीनही चर्चेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय असे दाखवत असला तरी, पडद्यामागे मात्र चीनचे दुसरेच मनसुबे असल्याचे दिसत आहे, चीनने तिबेटमध्ये रात्री युद्धसराव केला असल्याची बातमी समोर आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांडने रात्रीच्या अंधारात उंचावरील क्षेत्रात युद्ध लढण्याचा सराव केला. शत्रुच्या प्रदेशात घुसखोरीचा युद्धाभ्यास करण्यासाठी त्यांनी ४७०० मीटर उंचीवर सैन्य पाठवले होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत युद्ध लढण्याच्या आपल्या क्षमतेची त्यांनी चाचणी घेतली असल्याची बातमीही एका चिनी वर्तमानपत्राने दिली आहे. रात्री एकच्या सुमारास तिबेट मिलिट्री कमांडच्या युनिटने तांगगुला पर्वतरांगांमध्ये हा युद्ध सराव केला. या युद्धसरावामध्ये चीनने ड्रोन विमानांमधून बॉम्बफेकही केली असल्याचे या बातमीत म्हटले आहे.

भारताची सीमा, हाँगकाँग किंवा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कारवाया या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या वर्तनाचाच एक भाग आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. चीनचे सैनिक मोठय़ा प्रमाणावर भारताच्या उत्तरेकडे सरकल्याचे चित्र दिसत आहे, हाँगकाँगमधील जनतेच्या स्वातंत्र्यावरही चीनने घाला घातला आहे, असेही पॉम्पिओ यांनी वादग्रस्त कायद्याच्या अनुषंगाने म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन वेगाने लष्करी आणि आर्थिक कारवाया करीत आहे, त्यामुळे त्या क्षेत्रातील अनेक देशांची चिंता वाढली आहे, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, भारत आणि चीनची सीमा उंचावरील क्षेत्रामध्ये आहे. अलीकडेच दोन्ही देशांमध्ये काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे तिथे अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत असे या चीनच्या वर्तमानपत्राने दिलेल्या या बातमीत म्हटले आहे. तसेच भारत-चीन सीमेवर स्थिती स्थिर आणि नियंत्रणात असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी म्हटले होते. तरीही हा युद्धसराव कशासाठी चीनचं पडद्यामागे काय चाललं आहे असा प्रश्न सध्या पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT