Plane Crashes In China Sakal
ग्लोबल

चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

निनाद कुलकर्णी

बीजिंग : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्यप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल झाले असून, घटनास्थळी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. चीनच्या नागरी उड्डाण प्रशासन (CAAC) ने सांगितले की, विमानात एकूण 132 प्रवासी होते. यापैकी 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर होते. चीनच्या सरकारी टीव्ही सीसीटीव्हीने सोमवारी सांगितले की, आतापर्यंत मृतांच्या संख्येबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून या अपघाताने आपल्याला धक्का बसला असल्याचे शी झिनपिंग यांनी म्हटले आहे. (Plane Crashes In China)

चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, या बोईंगने दक्षिण-पश्चिम युनान प्रांतातील कुनमिंग चांगशुई विमानतळावरून दुपारी 1.15 वाजता उड्डाण केले. दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील ग्वांगझू विमानतळावर दुपारी 3.07 वाजता ते उतरणार होते. अपघातग्रस्त बोईंग हे 162 सीटर असून, यामध्ये बिझनेस क्लासमध्ये 12 तर, इकॉनॉमी क्लासमध्ये 150 सीट आहेत.

अपघातग्रस्त विमान चायना इस्टर्न एअरलाइन्सचे असून ते 133 प्रवाशांना घेऊन कुनमिंगहून ग्वांगझूला निघाले होते. त्यावेळी गुआंग्शी प्रदेशात या विमानाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तो डोंगराळ भाग असून अपघातानंतर डोंगरावर आग लागली आहे. दरम्यान, विमानात प्रवास करत असेलल्या प्रवाशांबद्दल अद्यप कोणतीही माहिती समजू शकलेली नसून, घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

चायना इस्टर्न ही चीनच्या प्रमुख तीन एअरलाइन्सपैकी एक असून, ही कंपनी त्यांची सेवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देते. हे विमान जून 2015 मध्ये बोईंगकडून चायना इस्टर्नला देण्यात आले होते आणि सहा वर्षांपासून ते सेवेत कार्यरत होते. ट्विन-इंजिन, सिंगल आयल बोईंग 737 हे लहान आणि मध्यम अंतराच्या उड्डाणांसाठी जगातील सर्वात लोकप्रिय विमानांपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT