Kathmandu Plane Crash 
ग्लोबल

Kathmandu Plane Crash: काठमांडूत मोठा विमान अपघात! 19 जणांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; 15 जणांचा मृत्यू

त्रिभुवन इथून हे विमान पोखरला जात होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नेपाळची राजधानी काठमांडू इथं मोठा विमान अपघात झाल्याचं वृत्त आहे. त्यानुसार १९ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान उड्डाणादरम्यान रनवेवरुन घसरलं. यांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली.

शौर्य एअरलाईन्सचं हे विमान होतं, विमान रनवेवरुन घसरल्यानं त्यानं पेट घेतला. यामध्ये विमान जळून खाक झालं आहे. त्याचे अवशेष गोळ्या करण्याचं काम आता बचाव पथक करत आहे. तसंच आत्तापर्यंत १९ पैकी १५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

इथल्या पहाडी भागातील विमानतळावरील धावपट्टीवरुन जात असताना नियंत्रण गमावल्यानं ते बाजुला एका दरी सदृश्य मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळलं. अपघातानंतर विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाली होती. तसेच बचाव पथकांनी तातडीनं आपलं काम सुरु केलं. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. त्रिभुवन इथून हे विमान पोखरला जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT