PM Modi Biden Meeting
PM Modi Biden Meeting  e sakal
ग्लोबल

PM मोदी आणि बायडन यांची बैठक, या मुद्द्यांवर चर्चा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Biden) यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. यावेळी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. युक्रेन आणि रशियामध्ये (Ukraine Russia War) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. रशियाकडून तेल खरेदी करू नये, असा अमेरिकेचा भारतावर दबाव आहे. त्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी आणि बायडन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच दक्षिण आशिया आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सध्याच्या घडामोडींवर विचार विनिमय करतील, असे एका निवेदनातून सांगण्यात आले आहे. तसेच पुढील आठवड्यात देखील अमेरिका आणि भारत यांच्यामधील द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यामध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.

गेल्या दीड महिन्यात अनेक देशांचे उच्चस्तरीय नेते भारतात आले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, त्यांच्या मुली आणि त्यांच्या संपूर्ण देशावर आर्थिक निर्बंध असताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह भारतात आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेण्यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. त्याचवेळी अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनीही नवी दिल्लीला भेट देऊन रशियाकडून तेल खरेदीबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे स्पष्ट केले आहे की, तेलाच्या संदर्भात भारत आपल्या हिताला प्राधान्य देईल.

अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत भारतानेही क्वाड संघटना स्थापन केली आहे. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरात LAC आणि चीनच्या वाढत्या हालचालींवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे. मात्र, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक राजकीय वातावरण झपाट्याने बदललं आहे. आजच्या बैठकीत दोन्ही देश आपल्या देशाच्या हितावर आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच द्विपक्षीय जागतिक धोरण अधिक मजबूत करतील, असे एका निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT