PM Modi France Visit eSakal
ग्लोबल

PM Modi France Visit : राफेल-एम विमाने, स्कॉर्पीन पाणबुड्या; पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यामध्ये मोठ्या करारांची शक्यता

फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Sudesh

पंतप्रधान मोदी हे १३ आणि १४ जुलै रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर असणार आहेत. फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्यात आलं आहे. फ्रान्सचा इतिहास आणि लष्करी ताकद दाखवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

फ्रान्स भारतासाठी दीर्घकाळापासून एक महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याला खूप महत्त्व आहे. या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये आयएनएस विक्रांतसाठी २६ राफेल-एम विमाने आणि स्कॉर्पिन पाणबुड्या हे करार अपेक्षित आहेत.

राफेल-एम

आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजासाठी विमाने घेण्याचा विचार भारत करत आहे. यासाठी एफ/ए १८ सुपर हॉर्नेट आणि राफेल मरीन ही विमाने शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. यामध्ये राफेल-एम विमानांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या दोऱ्यामध्ये २६ राफेल मरीन विमानांबाबत करार होऊ शकतो. यातील चार ट्रेनर एअरक्राफ्ट असणार आहेत. संरक्षण मंत्री देशात परतल्यानंतर लवकरच संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या खरेदीसाठी आवश्यकतेची स्वीकृती (AON) दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

"आपल्या एअरक्राफ्ट कॅरिअरसाठी विमानांची आपल्याला गरज आहे. भारत सध्या ट्विन इंजिन डेक आधारित फायटर प्रोग्रामवर काम करत आहे. मात्र. याला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या असलेली गरज पूर्ण करण्यासाठी एफ/ए १८ सुपर हॉर्नेट किंवा राफेल-एम यांपैकी एक विमान निवडावे लागेल", असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

स्कॉर्पेन पाणबुड्या

पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये प्रोजेक्ट ७५चा भाग म्हणून तीन स्कॉर्पिन दर्जाच्या पाणबुड्या विकत घेतल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या आपल्याकडे माझगाव डॉकने तयार केलेल्या सहा स्कॉर्पिन पाणबुड्या उपलब्ध आहेत. फ्रान्सकडून आणखी तीन पाणबुड्या घेतल्यास, भारताच्या नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे.

याव्यतिरिक्त या दौऱ्यामध्ये विमानांच्या इंजिनबाबत देखील एक करार होण्याची शक्यता आहे. भारताच्या प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या (AMCA) इंजिनांवर संयुक्तपणे काम करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो. यासोबतच, जैतापूर अणुउर्जा प्रकल्पावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECP Pakistan: आता खोटं प्रतिज्ञापत्र चालणार नाही! निवडणूक आयोग नियम बदलणार; पाकिस्तानात नेत्यांची माहिती थेट तपासणार

Walur Helical Stepwell Revival: वालूरच्या ऐतिहासिक हेलिकल सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन वेगात; सेवावर्धिनी संस्थेच्या प्रयत्नांनी संवर्धनाला नवे बळ

Marathi News Live Updates : कपिल सिबल जे काही बोलत आहेत, ते काही अंतिम सत्य नाही - म्हस्के

Mumbai Local Women Coaches: मुंबई लोकलमध्ये सर्व महिला डबे एकत्र जोडण्याचा प्रस्ताव; कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा, ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चाही विचार

Paithan Village Protest: आडूळ ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ दिवसांत चौकशीचा अहवाल देण्याचे लेखी आश्वासन; सचिन चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे

SCROLL FOR NEXT