pm modi gifts Wooden Handcarved box with Rogan Painting to japan pm fumio kishida
pm modi gifts Wooden Handcarved box with Rogan Painting to japan pm fumio kishida  
ग्लोबल

PM मोदींची जपानच्या पंतप्रधानांना खास भेट, एकाच कुटुंबाकडे आहे ही कला

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या जपान दौऱ्यावर आहेत. दरम्यान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) एक खास भेट दिली आहे. हा एक लाकडी हाताने कोरलेला बॉक्स आहे ज्यावर रोगन पेंटिंग (Rogan Paintings) करण्यात आलेली आहे. ही भेट विशेष आहे, कारण ती दोन प्रकारच्या कलांचे मिश्रण आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या क्वाड (QUAD) कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जपानमध्ये गेले आहेत, या भेटीदरम्यान त्यांनी ही भेटवस्तू जपानच्या पंतप्रधानांना दिली.

रोगन पेंटिंग काय असते?

रोगन पेंटिंग हे कापडावर केलेले पेंटिंग असते जे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात केले जाते. यासाठी वापरले जाणारा पेंट हा उकळलेले तेल आणि भाज्यांच्या रंगापासून बनवला जातो. हे पेंटिंग एकतर मेटल ब्लॉकवर केले जाते किंवा यासाठी कापड वापरले जाते. हे चित्र बनवण्याची कला फक्त गुजरातमधील एकाच कुटुंबाकडे आहे.

रोगन हा पारशी शब्द आहे ज्याचा अर्थ वार्निश किंवा तेल आहे. हे पेंटिंग बनवण्यासाठी खूप कौशल्य आणि मेहनत घ्यावी लागते. कलाकार हा पेंट त्याच्या तळहातावर ठेवतो. यानंतर पेंट सामान्य तापमानाला पृष्ठभागावर ठेवले जाते. नंतर धातूच्या रॉडच्या मदतीने कलाकृती कोरल्या जातात.

pm modi gifts Wooden Handcarved box with Rogan Painting to japan pm fumio kishida

पूर्वी पेंटिंगची रचना साधी असायची पण नंतर ती स्टायलिश झाली. दुसरीकडे, लाकडावर हाताने कोरीव काम करणे हे पारंपारिक जाळीच्या डिझाइनचा एक प्रकार आहे. जुन्या इमारतींमध्ये अशा रचना आपल्याला पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT