ग्लोबल

वॉशिंग्टनमध्ये मोदींचे जंगी स्वागत; पावसात थांबले भारतीय अमेरिकन

सकाळ डिजिटल टीम

भर पावसात भारतीय अमेरिकन पंतप्रधान मोदींची वाट पाहत होते. पंतप्रधान मोदींनीही या सर्वांची गाडीतून खाली उतरून भेट घेतली.

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. गुरुवारी ते वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. यावेळी मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील अनेक अधिकारी पोहोचले होते. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंह संधु विमानतळावर स्वागतासाठी पोहोचले होते. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर १०० पेक्षा जास्त भारतीय लोक पोहोचले होते.

मोदी वॉशिंग्टनमध्ये पोहचताच विमानतळावर उपस्थित भारतीयांनी घोषणा देण्यास सुरु केली. भर पावसात भारतीय अमेरिकन पंतप्रधान मोदींची वाट पाहत होते. पंतप्रधान मोदींनीही या सर्वांची गाडीतून खाली उतरून भेट घेतली.

वॉशिंग्टनलला पोहोचल्यानंतर तिथले फोटोही पंतप्रधान मोदींनी शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं की, वॉशिंग्टन डीसीमध्ये पोहोचलो. पुढचे दोन दिवस मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, स्कॉट मॉरिसन, सुगा योशिहिदे यांची भेट घेणार आहे. तसंच क्वाड मिटिंगमध्ये सहभागी होणार असून आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा करणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ते संबोधन करणार असून क्वाड देशांच्या नेत्यांसोबत चर्चाही करणार आहेत. याशिवाय मोदी व्हाइट हाउसमध्ये राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्यो बायडेन यांची भेट शुक्रवारी २४ सप्टेंबरला होणार आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच त्यांना भेटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT