PM Modi UAE Visit eSakal
ग्लोबल

PM Modi UAE Visit : फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी UAE ला रवाना; अबूधाबीच्या प्रिन्सची घेणार भेट

यावेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा होईल.

Sudesh

UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले दोन दिवस फ्रान्स दौऱ्यावर होते. शनिवारी सकाळी ते फ्रान्समधून थेट संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाले. याठिकाणी ते यूएईचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतील.

पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यापूर्वी स्पष्ट केलं होतं, की शेख मोहम्मद बिन जायद हे दोन्ही देशांच्या भागीदारीच्या भविष्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोडमॅपशी सहमत आहेत. या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे करता येतील, याबाबत चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदींनी म्हटलं होतं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. "भारत-फ्रान्सला संबंधांमध्ये एक नवीन पर्व सुरू करणाऱ्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला निरोप दिला. पंतप्रधान आता आपल्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यासाठी अबूधाबीला रवाना झाले." अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.

संभाव्य वेळापत्रक

पंतप्रधान मोदी सकाळी १०.४५ वाजेपर्यंत यूएईला पोहोचतील. त्यानंतर दुपारी २.१० वाजता त्यांचं औपचारिक स्वागत होईल. दुपारी ३.२० वाजता ते औपचारिक लंचला उपस्थित राहतील. त्यानंतर ४.४५ वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील.

फ्रान्स दौरा सुफळ

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेडला उपस्थिती दर्शवली. या दौऱ्यामध्ये त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, लष्करी सन्मान आणि ग्रँड क्रॉस ऑफ दि लीजन या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यासोबतच, कित्येक आर्थिक, शैक्षणिक आणि लष्करी करारही या दौऱ्यामध्ये करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT