ग्लोबल

काश्‍मीरबाबत मध्यस्थी अमान्यच; मोदींनी स्पष्ट केली भूमिका

वृत्तसंस्था

बिआरिट्‌झ/लंडन : "काश्‍मीरबाबत तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीतच मोदींनी ही भूमिका स्पष्ट केल्यावर ट्रम्प यांनीही त्याला अनुमोदन दिले. हा प्रश्‍न भारत-पाकिस्तानदरम्यानचा असून, तो चर्चेने सोडविला जाईल. तिसऱ्या देशाला त्रास देण्याची आमची इच्छा नाही, असेही मोदींनी सांगितले. 


फ्रान्समधील बिआरिट्‌झ या शहरात सुरू झालेल्या "जी-7' देशांच्या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांबरोबर संवाद साधताना मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली. या परिषदेत मोदींबरोबर होणाऱ्या चर्चेत आपण काश्‍मीरच्या मुद्द्यावरही चर्चा करू, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, मोदींनी सडेतोड उत्तर देत भारताची भूमिका स्पष्ट केली. 

काश्‍मीरसंदर्भात भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थीची तयारी ट्रम्प यांनी याआधीही दर्शविली होती. मात्र, तेव्हाही भारताने हा पर्याय स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला होता. 

"भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान अनेक प्रश्‍न आहेत आणि त्यासंदर्भात तिसऱ्या देशाला आम्ही त्रास देऊ इच्छित नाही. आम्ही आमचे प्रश्‍न चर्चेने सोडवू शकतो. भारत आणि पाकिस्तान 1947 पूर्वी एकत्रच होते. आमचे प्रश्‍न आम्ही चर्चेने सोडवू शकू, असा मला विश्‍वास आहे,' असे मोदी यांनी माध्यम प्रतिनिधींबरोबर बोलताना नमूद केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर झालेल्या दूरध्वनी संभाषणात इम्रान यांनी दोन्ही देशांपुढील गरिबी आणि अन्य प्रश्‍नांचा उल्लेख केला होता आणि दोन्ही देशांनी एकत्रपणे लोककल्याणासाठी मार्ग अनुसरावा. असे मत व्यक्त केले होते, असे मोदी यांनी सांगितले. 

मोदी यांच्याबरोबर काल माझी काश्‍मीर प्रश्‍नाबाबत चर्चा झाली, तेव्हा भारत-पाकिस्तान हा प्रश्‍न सोडवू शकतात, असे मोदींनी मला सांगितल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे द्विभाजन करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही नेत्यांची काल चर्चा झाली होती. मात्र, जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानचे पित्त खवळले असून, त्या देशाचे नेते भारताविरुद्ध जगभर गरळ ओकत फिरत आहेत. तथापि, जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द करणे, हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न असल्याचे भारताने जागतिक मंचावर स्पष्ट केले असून, पाकिस्तानने वस्तुस्थिती स्वीकारावी, असेही सुनावले आहे. 

मोदींचे इंग्रजी उत्तम : ट्रम्प 
मोदी आणि ट्रम्प यांच्यातील बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. "खरे तर मोदी अत्यंत उत्तम इंग्रजी बोलतात; ते केवळ चर्चाच करत नाहीत,' असे ट्रम्प यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही नेत्यांनी हास्य करून एकमेकांना दाद दिली. त्यात मोदींनी ट्रम्प यांचा हात त्यांच्या हातात घेऊन आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT