pm modi presents 12 point proposals to expand india asean cooperation sakal
ग्लोबल

PM Modi : ‘आसिआन’बरोबर दृढ संबंध हवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन; बारा मुद्द्यांचा प्रस्ताव सादर

इंडोनेशियातील जाकार्ता येथे विसाव्या ‘आसिआन-भारत’ परिषदेला पंतप्रधान मोदी आज उपस्थित

सकाळ वृत्तसेवा

जाकार्ता (इंडोनेशिया) : दक्षिण-पूर्वेकडील आशियाई देशांची संघटना असलेल्या ‘आसिआन’ आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा मुद्द्यांचा प्रस्ताव सादर केला.

तंत्रज्ञान सुधारणा, व्यापार, आर्थिक देवाण-घेवाण यांच्यासह इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यास भारत उत्सुक आहे, असे मोदी यांनी सांगितले. तसेच, दहशतवादासारख्या समस्येचा एकत्रितपणे सामना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

इंडोनेशियातील जाकार्ता येथे विसाव्या ‘आसिआन-भारत’ परिषदेला पंतप्रधान मोदी आज उपस्थित होते. मोदी यांनी ‘आसिआन’च्या सदस्य देशांच्या प्रमुखांबरोबर आणि प्रतिनिधींबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

‘आसिआन’चे सरचिटणीस डॉ. काओ किम हॉर्न यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत सागरी व्यापार सहकार्य आणि अन्न सुरक्षा या विषयांवरील प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

मोदींच्या प्रस्तावातील ठळक मुद्दे

  • दक्षिण दिशेकडील देश-पूर्व आशिया, भारत, पश्‍चिम आशिया आणि युरोप यांना जोडणारा बहुस्तरीय आणि आर्थिक कॉरिडॉर असावा

  • भारताची डिजिटल पायाभूत यंत्रणेचा आसिआन देशांनी उपयोग करावा

  • डिजिटल आणि आर्थिक सहकार्यासाठी ‘आसिआन-भारत’ निधी

  • दहशतवाद, त्यांना आश्रय आणि सायबर गुन्हेगारी यांच्याविरोधात एकत्रित लढाई

  • आसिआनच्या आर्थिक आणि संशोधन संस्थेला सहकार्य करणार

  • दक्षिण गोलार्धातील देशांच्या समस्या जगासमोर मांडणे

  • जन औषधी केंद्रांद्वारे गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देणार

  • आपत्ती निवारणात सहकार्य

  • सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर सहकार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: स्मृती मानधना - प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हा' पराक्रम करणारी जगातील पहिली जोडी; ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

बकरी ईदला आम्ही ज्ञान पाजळत नाही, तुम्ही फटाक्यांवर बोलू नका; दिवाळीआधी धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

Photos : जस्टिन ट्रुडो 'या' सिक्रेट गायिकेला किस करतानाचा फोटो व्हायरल; अर्धनग्न अवस्थेत मिठीत घेताना दिसले कॅनडाचे माजी पंतप्रधान

Pune : पाषाणमध्ये नदीत वाहून आला मृतदेह, ५-६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता; हत्या की आत्महत्या?

School Fee: आता युपीआयद्वारे एका क्लिकवर शाळेची फी जमा करता येणार! केंद्र सरकारचे मोठे पाऊल, आदेशाचे पत्र जारी

SCROLL FOR NEXT