ग्लोबल

PM मोदींकडून कमला हॅरिस यांना खास भेट; दिली आजोबांशी निगडीत आठवण देखील

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. स्थानिक वेळेनुसार, गुरुवारी मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी पंतप्रधान मोदींनी एक अनोखी अशी भेटवस्तू अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना दिली आहे. कमला हॅरिस यांच्यासोबतच इतर क्वाड लीडर्सना देखील मोदींनी भेटवस्तू दिल्या आहेत.

कमला हॅरिस यांना भेट म्हणून दिलेला बुद्धीबळाचा अनोखा सेट

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना त्यांच्या भारताशी असलेल्या नात्याची आठवण व्हावी, म्हणून मोदींनी एक खास भेटवस्तू त्यांना देऊ केली आहे. मोदी यांनी कमला हॅरिस यांचे आजोबा पीव्ही गोपालन यांच्याशी निगडीत काही जुन्या वस्तू दिल्या आहेत. पीव्ही गोपालन हे त्यांच्यावेळचे एक वरिष्ठ सरकारी अधिकारी होते, ज्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं होतं. लाकडाच्या हस्तशिल्प फ्रेममध्ये सुशोभित करुन ही भेट देण्यात आली आहे.

कमला हॅरिस यांना आजोबांची आठवण करुन देणारी खास भेट

बुद्धीबळाचा खास सेट

पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना गुलाबी मिनाकारी नक्षीदार असा बुद्धीबळाचा सेट देखील दिला आहे. हा सेट जगातील सर्वांत जुन्या शहरांमध्ये सामील असणाऱ्या काशीशी निगडीत आहे. पंतप्रधान मोदी इथूनच खासदार आहेत. या बुद्धिबळ संचाचा प्रत्येक संच हस्तनिर्मित आहे, त्याचा तेजस्वी रंग काशीचे तेज दर्शवतो.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनाही अनोखे असे मिनाकारी जहाजाचे शिल्प दिले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना दिलेले जहाजाचे शिल्प

जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांना पंतप्रधान मोदी यांनी चंदनापासून बनवलेली एक बुद्धाची मुर्ती दिली आहे. जपानच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि अफगाणिस्तानसह अलीकडील जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्राबद्दलच्या आपल्या वचनबद्धतेबद्दल सांगितले.

जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांना दिलेली बुद्धाची मुर्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT