PM Modi Global Leader eSakal
ग्लोबल

Global Leader : G20 परिषदेमुळे मोदींच्या लोकप्रियतेत वाढ; 'ग्लोबल लीडर्स' यादीत पुन्हा पटकावलं पहिलं स्थान

PM Modi Global Leader : मॉर्निंग कन्स्लटन्ट संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

Sudesh

Global Leader Approval : जी-20 परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्लोबल लीडर्स अप्रूव्हल रेटिंगमध्ये PM नरेंद्र मोदींना तब्बल 76% मतं मिळाली आहेत. त्यामुळे सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये मोदींनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

मॉर्निंग कन्स्लटन्ट संस्थेच्या एक्स हँडलवरून ही आकडेवारी शेअर करण्यात आली आहे. यामध्ये ग्लोबल लीडर्सची यादी दिलेली आहे. ही आकडेवारी 14 सप्टेंबर रोजी अपडेट करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान मोदी आहेत. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यामध्ये सातव्या क्रमांकावर आहेत.

या यादीमध्ये मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर स्विस प्रेसिडेंट अलाईन बेर्सेट (76%), तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे प्रेसिडेंट आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडॉर (61%) हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे 40% मतांसह सातव्या क्रमांकावर आहेत. तर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे 27% मतांसह पंधराव्या क्रमांकावर आहेत.

यापूर्वी जूनमध्ये ही यादी अपडेट करण्यात आली होती. त्यातही जो बायडेन हे सातव्या स्थानावरच होते. ऋषी सुनक मात्र 12व्या स्थानावरुन नव्या यादीत 15व्या स्थानावर घसरले आहेत.

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या मतामध्ये एक टक्क्याची घसरण झाली असली, तरीही पहिल्या क्रमांकावर ते कायम आहेत. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नवी यादी ही 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान गोळा केलेल्या डेटानुसार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepak Pawar: मराठी माणूस मुस्लिमांचा अकारण राग करतो, पण जैन लोकांची मुजोरी...; दीपक पवारांचं सूचक वक्तव्य, काय म्हणाले?

Free Bus Travel for Women: रक्षाबंधनाच्या दिवशी ‘या’ राज्यांमध्ये महिलांना बस प्रवास मोफत असणार

भारताला मोठा धक्का! रिषभ पंत Asia Cup 2025 स्पर्धेला मुकणार; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता

Latest Maharashtra News Updates: वर्गमित्राने भरदिवसा आठवीच्या विद्यार्थ्यावर केले धारदार शस्त्राने वार

Manchar News : अवसरी खुर्द येथील गंगोत्रीतील २४ यात्रेकरू सुखरूप! मुख्याध्यापक विठ्ठल खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल; नातेवाईकांना दिलासा

SCROLL FOR NEXT