pm modi speech In UAE hindu Mandir Abu Dhabi Ahlan Modi event Latest marathi news  
ग्लोबल

Ahlan Modi Event : अबूधाबीतील मंदिरासाठी जागा कशी मिळाली? PM मोदींनी सांगितला किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या यूएईच्या दौऱ्यावर आहेत. येथे अबूधाबी येथे एका भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन उद्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे.

रोहित कणसे

Ahlan Modi Event : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या यूएईच्या दौऱ्यावर आहेत. येथे अबूधाबी येथे एका भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन उद्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वी आज मोदींनी यूएई येथील भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. अबूधाबी येथील झायेद स्पोर्ट्स स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमात मोदींनी भारत-यूएई यांच्यातील संबंधांवर देखील भाष्य केलं.

अबूधाबीमध्ये तुम्ही नवीन इतिहास रचला आहे. तुम्ही युएईच्या कानाकोपऱ्यातून आला आहात. तसचे भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आला आहात पण तुमच्या सगळ्यांची हृदय जोडली गेलेली आहेत. येथील प्रत्येक हृदय, प्रत्येक श्वास भारत-युएई दोस्ती जिंदाबादचा नारा देत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मी आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आलो आहे. समुद्रापार ज्या देशाच्या मातीत तुम्ही जन्म घेतला मी त्या मातीचा सुगंध तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मी तुमच्या १४० कोटी बांधवांचा संदेश घेऊन आलो आहे आणि तो संदेश आहे की भारताला तुमच्यावर अभिमान आहे, तुम्ही देशाचा गौरव आहात, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दहा वर्षात माझी ही यूएईची सातवी भेट आहे. शेख बिन मोहम्मद झायद आजही माझं स्वागत करण्यासाठी विमानतळावर आले होते. त्यांचं प्रेम आणि आपलेपण तेच होतं. ही गोष्ट त्यांना खास बनवतं. मला आनंद आहे की मला देखील त्यांचं चार वेळा भारतात स्वागत करण्याची संधी मिळाली. काही दिवसांपूर्वीच ते गुजरातमध्ये आले होते. तेव्हा लाखो लोक त्यांचे आभार मानण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा झाले होते. हे आभार ते ज्या प्रकारे यूएईमध्ये तुम्हा सगळ्यांची काळजी घेत आहेत त्यासाठी मानण्यात आले.

माझं भाग्य आहे की, युईने सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ झायद याने सन्मानित केलं.हा सन्मान फक्त माझा नाही तर कोट्यवधी भारतीयांचा आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ब्रदर शेख मोहम्मद बिन झायद यांची भूमिका भारत यूएईमधील नाते घट्ट होण्यात खूप महत्वाची राहिली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तुमच्या प्रति (भारतीय नागरीक) ते किती संवेदनशीलतेने भरलेले आहेत हे मला कोविडच्या काळात देखील पाहायला मिळालं. त्यांनी भारतीयांच्या लसीकरण आणि उपचारासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यामुळे येथील भारतीयांची मला कुठलीच चिंता करावी लागली नाही.

२०१५ मध्ये देखील त्यांच्यासमोर येथे अबूधाबीत एका मंदिराचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तेव्हा त्यांनी एक क्षणीही न लावता होकार दिला. त्यांनी असेही सांगितलं की, तुम्ही जी जागा दाखवून द्याल ती जमीन मी तुम्हाला देऊन टाकेल आणि आता अबूधाबीत या भव्यदिव्य मंदिराच्या लोकार्पणाची वेळ आली आहे. भारत-युएईची मैत्री जेवढी जमीनीलगत मजबूत आहे तेवढीच याचा झेंडा अंतराळात फडकत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT