PM Modi in US Congress eSakal
ग्लोबल

PM Modi in US : कमला हॅरिस अन् समोसा.. पंतप्रधान मोदी असं काय म्हणाले, की अमेरिकेच्या खासदारांनी वाजवल्या टाळ्या!

मला विश्वास आहे, की आता विविध भारतीय खाद्यपदार्थ देखील इथं पहायला मिळतील.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱ्यामध्ये तेथील संसदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केलं. ते म्हणाले, की लोकांमध्ये असलेल्या समानतेच्या जोरावर अमेरिका टिकून आहे. जगभरातून आलेल्या लोकांना समान वागणूक देत, अमेरिकेने त्यांना आपल्या सोबत घेतलं आहे.

भारतातील लाखो लोक

अमेरिकेत भारतातून आलेले लाखो लोक आहेत. यांपैकी कित्येक लोक इथं संसदेत देखील बसले आहेत. विशेष म्हणजे, यांपैकीच एक माझ्या मागेही उभ्या आहेत, ज्यांनी खरंतर इतिहास रचला होता. पंतप्रधान मोदी यावेळी कमला हॅरिस यांच्याबद्दल बोलत होते.

कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या अशा उपराष्ट्रपती आहेत, ज्या भारतीय वंशाच्या आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, की अमेरिकेच्या संसदेत हल्ली समोसा कॉकसचा प्रभाव भरपूर दिसून येतो. मला विश्वास आहे, की आता विविध भारतीय खाद्यपदार्थ देखील इथं पहायला मिळतील.

समोसा कॉकस म्हणजे काय?

अमेरिकेच्या संसदेत असणाऱ्या भारतीय वंशाच्या खासदारांना गमतीने समोसा कॉकस (Samosa Caucus) म्हटलं जातं. २०१६ साली झालेल्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीत याची सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच अमेरिकेत भारतीय वंशाचे काही लोक खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर हे लोक संसदेत कित्येक वेळा एकत्र बसलेले दिसत.

अमेरिकी प्रतिनिधी सभेचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी या काळात पहिल्यांदा या खासदारांच्या गटाला समोसा कॉकस असं नाव दिलं होतं. कमला हॅरिस या देखील या गटातील एक प्रमुख सदस्य होत्या. अमेरिकेच्या संसदेत भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या लक्षात यावी, यामुळे हे नाव दिल्याचं राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख करून केलेल्या कौतुकानंतर कमला हॅरिस हसू लागल्या होत्या. तर, संसदेतील इतर खासदारांनी टाळ्या वाजवून मोदींच्या या कौतुकाला दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT