Narendra Modi Sakal
ग्लोबल

जगातील प्रशंसनीय नेत्यांमध्ये PM मोदी अव्वल; बायडन, मार्केल पिछाडीवर

पाहा जगातील प्रशंसनीय नेत्यांची संपूर्ण यादी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रशंसनीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे. ७० टक्के अॅप्रुव्हल रेटिंगसह मोदी या १३ जणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनाही मागे टाकलं आहे. अमेरिकन डेटा इंटिलिजन्स कंपनी 'द मॉर्निंग कन्सल्ट' या संस्थेनं याबाबत सर्व्हेक्षण केलं होतं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 'कू' अॅपवर याबाबत माहिती शेअर केली.

गोयल म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक प्रशंसनीय नेते बनले आहेत. यासाठी ७० टक्के अॅप्रुव्हल रेटिंग मिळालं आहे. यामुळं ते आंतरराष्ट्रीय नेत्यांना लीड करत आहेत. यामुळं सर्वाधिक प्रशंसनीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील १३ नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींना मान्यता मिळाली आहे"

या सर्व्हेनुसार, मोदींनी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रूयू मॅन्युअल लोपेझ, इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅघी, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मागे टाकलं आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान त्रुदीव्ह, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैरे बोलसोनारो आदींचाही समावेश आहे.

नेत्यांना कसं दिलं जातं अॅप्रुव्हल रेटिंग?

प्रत्येक देशातील प्रौढ व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांच्या नेत्यांना मंजुरी द्यायची किंवा नाही हे ठरवलं जातं. या सर्व्हेसाठी मॉर्निंग कन्सल्टने भारतात २,१२६ लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या. तसेच ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधल्या देखील प्रौढ लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये सात दिवसांच्या बदलत्या सरासरीनुसार, विविध देशाच्या नेत्यांना टक्केवारीसह अॅप्रुव्हल रेटिंग देण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT