PM Modi US Visit eSakal
ग्लोबल

PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार अंतराळ संबंधांवर चर्चा; गगनयान मोहिमेसाठी नासा करू शकतं मदत

मानवी अंतराळ उड्डाण, ग्रह सुरक्षा आणि व्यावसायिक अंतराळ क्रियाकल्प अशा गोष्टींवर चर्चा होणार आहे.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये विविध गोष्टींवर चर्चा होईल. यातच मानवी अंतराळ उड्डाण, ग्रह सुरक्षा आणि व्यावसायिक अंतराळ क्रियाकल्प अशा तीन गोष्टींवरही चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधील अंतराळ-संबंधित सहकार्य वाढवण्याच्या उद्दिष्टाने ही चर्चा होईल.

जानेवारीमध्येच दोन्ही देशांनी अंतराळासंबंधी गोष्टींमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यावर सहमती दर्शवली होती. इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीस (ICET) अंतर्गत दोन्ही देशांचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आणि अजित डोभाल यांनी व्हाईट हाऊस फॅक्टशीटवर सहमती दर्शवली होती.

नासा जॉन्सन स्पेस सेंटर येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) साठी प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करणे, व्यावसायिक अवकाशात सहकार्य करण्यासाठी नवीन संधी ओळखणे, यासोबतच मानवी अंतराळ उड्डाण सहकार्य मजबूत करणे अशा गोष्टींचा उल्लेख या फॅक्टशीटमध्ये केला होता.

याबाबत माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अंतराळवीर प्रशिक्षण, क्रू रेस्क्यू आणि मानवी अंतराळ उड्डाणातील इतर क्रियाकलपांवर सखोल सहकार्याबाबत चर्चा होईल. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

गगनयान मोहिमेत मदत

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेत देखील अमेरिका भारताची मदत करणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीर पाठवणार आहे. २०२५ साली हे गगनयान लाँच होण्याची शक्यता आहे.

आर्टेमिस अकॉर्ड्स

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामध्ये भारताचा आर्टेमिस अकॉर्ड्समध्ये सहभाग होण्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते. या करारावर स्वाक्षरी करणारे देश अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी, अंतराळातील मदतीसाठी आणि अंतराळवीरांना पृथ्वीवर येताना मदत करण्यासाठी, तसेच अवकाशात सोडलेल्या वस्तू पृथ्वीवर परत आणण्यासाठी कटिबद्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT