ग्लोबल

जगातील सर्वांधिक मान्यताप्राप्त नेते मोदीच! बायडन यांनाही टाकलं मागे

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोना काळात देखील पंतप्रधान मोदींचा जलवा कायम आहे. त्यांची लोकप्रियता ही भारतात सोडा जागतिक पटलावर देखील अबाधित आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक मान्यताप्राप्त (Global Leader Approval) नेते आहेत. अमेरिकेची डेटा इंटेलिजेन्स फर्म 'मॉर्निंग कन्सल्ट'द्वारे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मान्यतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी आजही जागतिक नेत्यांच्य तुलनेत पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र ग्लोबल मोदींची ऍप्रुव्हल रेटींग 66 टक्के आहे. आकडेवारीनुसार, कोरोना काळात देखील पंतप्रधान मोदी अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनी सहित 13 इतर देशांच्या नेत्यांहून अधिक मान्यताप्राप्त आहेत.

अमेरिकेची डेटा इंटेलिजन्स फर्म 'मॉर्निंग कन्सल्ट'द्वारे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांच्या लोकप्रियतेत अथवा मान्यतेच्या रेटींगमध्ये घट झालेली पहायला मिळाली आहे. तरी देखील ते जगात टॉपवर असलेले नेते आहेत आणि जगातील इतर नेत्यांच्या तुलनेत यासंदर्भातील त्यांची कामगिरी उत्तम दिसून येत आहे. या ऍप्रूव्हल रेटींगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नंतर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी यांचा क्रमांक लागतो, ज्यांची ऍप्रुव्हल रेटींग 65 टक्के आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर आहेत. त्यांची रेटींग 63 टक्के आहे.

जागतिक नेत्यांचे असे आहे ऍप्रुव्हल रेटींग

'मॉर्निंग कंसल्ट' नियमितपणे जागतिक नेत्यांच्या ऍप्रूवल रेटिंगला ट्रॅक करतो. या रेटींगनुसार, पीएम मोदींच्या नंतर दूसऱ्या स्थानी इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी (65%) आहेत. त्यांच्या नंतर मॅक्सिकन राष्ट्रपती एंड्रेस मॅनुअल लोपेज ओब्रेडोर (63%), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (54%), जर्मन चान्सलर एंजेला मर्केल (53%), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (53%), कॅनाडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (48%), ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (44%), दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन (37%), स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेज (36%), ब्राजीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो (35%), फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रोन (35%) आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा (29%) आहेत.

भारतामध्ये 2,126 लोकांच्या सॅम्पल साईजच्या सर्व्हेमधून मॉर्निंग कन्सल्ट ग्लोबल लीड ऍप्रुव्हल रेटींग ट्रॅकरने पंतप्रधान मोदींसाठी 66 टक्के ऍप्रुव्हल दाखवले आहे तर 28 टक्क्यांनी त्यांनी अमान्यता दिली आहे. या ट्रॅकरला अलिकडेच 17 जून रोजी अपडेट केलं गेलं आहे. प्रत्येक देशाचं वेगवेगळं सॅम्पल साईज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat : निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचे बाशिंग! पालकमंत्री शिरसाट यांच्या पुत्राला शुभेच्छा देणारे शहरात झळकले होर्डिंग्ज

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात कंटेनरची तीन वाहनांना धडक, भोस्ते घाटातील घटना

Jitendra Awhad: जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्याची ठाण्यात पुनरावृत्ती, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Latest Marathi News Live Update : माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही पुत्रांचा आज भाजपमध्ये प्रवेश

Finnish Food : हेल्दी आणि ट्रेडिशनल! फिनलंडचे ‘फिनक्रिस्प’ आणि ‘पुला’ ब्रेड का आहेत खास?

SCROLL FOR NEXT