Trudeau and PM Modi Meet Amid Diplomatic Tensions at G7 Summit esakal
ग्लोबल

G7 Summit : पंतप्रधान मोदी आणि जस्टिन ट्रुडोंच्या भेटीत नेमकं झालं तरी काय? भारत-कॅनडाच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह,जाणून घ्या

India-Canada PM Meet : कॅनेडाच्या पंतप्रधानांशी केवळ शिष्टाचार भेटीचं कारण आहे मोठं,जाणून घ्या PM मोदी काय म्हणाले

Saisimran Ghashi

G7 Summit : इटलीमध्ये पार पडलेल्या G7 शिखर परिषदेच्या दरम्यान कॅनेडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टाचार भेट घेतली. कॅनडातील खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर यांच्या खुनामुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. पंतप्रधान मोदींनी या भेटीनंतर एक ओळीचा संदेश लिहिला, "G7 शिखर परिषदे दरम्यान कॅनेडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट घेतली".

कॅनेडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, "काही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचे वचन देण्यात आले आहे". मोदींनी इटली, फ्रान्स आणि जपानसह अनेक देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली, परंतु कॅनेडाच्या पंतप्रधानांशी केवळ शिष्टाचार भेट घेतली.

कॅनेडाने भारताच्या एजंट्सवर निज्जरच्या हत्येत सामील असल्याचा आरोप केला होता, जो भारताने "हास्यास्पद आणि प्रेरित" म्हणून फेटाळून लावला. या शिष्टाचार भेटीच्या दिवशी, ट्रुडो यांनी या संवेदनशील मुद्द्याबाबत तपशील देण्यास नकार दिला. "आपल्याला कळतेच की सध्या आपल्याकडे महत्वाचे मुद्दे आहेत आणि यावर पुढे बोलणे उचित ठरणार नाही," असे ट्रुडोचे प्रवक्ते अॅन-क्लारा वायलेनकौर्ट यांनी सांगितले.

शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक, जपानी पंतप्रधान फुमियो किशिदा, जर्मन चान्सलर ओलाफ स्कॉल्ट्ज आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या. ते यूएस राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही भेटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT