National Anthems Of India, US Played At Joint Base Andrews Upon PM's Arrival In Washington 
ग्लोबल

PM Modi US Visit: अमेरिकेच्या विमानतळावर वाजलं जन-गण-मन; PM मोदींची धडाकेबाज एन्ट्री

वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले

धनश्री ओतारी

वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. येथे त्यांना प्रथम गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर भारत आणि अमेरिकेचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. National Anthems Of India, US Played At Joint Base Andrews Upon PM's Arrival In Washington

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर बुधवारी रात्री उशिरा वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले. फ्लाइट लाईन सोहळ्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे विमानतळावर अमेरिकेचे मुख्य प्रोटोकॉल अधिकारी रुफस गिफर्ड यांनी स्वागत केले.

विमानतळावर त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. वॉशिंग्टनमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय वंशाचे लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाचवण्यात आलं.

PM मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी

येथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेनही उपस्थित होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या डिनरला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. डिनरमध्ये बाजरी आणि राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या आवडत्या पदार्थांचाही समावेश होता.

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खासगी डिनरचे आयोजन केले होते. डिनरमध्ये राष्ट्रपतींचे आवडते पदार्थ, आईस्क्रीम आणि पास्ता यांचाही समावेश होता. यादरम्यान अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT