pm narendra modi  sakal
ग्लोबल

G-7 मध्ये मोदींचा डंका! बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, बायडेन पडले मागे

PM मोदी बनले G7 मधले सर्वात लोकप्रिय नेते

सकाळ डिजिटल टीम

जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. त्याची लोकप्रियता 78 टक्के इतकी आहे. एका सर्वेक्षणानुसार, 22 देशांपैकी फक्त चार देशांच्या नेत्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रियता आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एलेन बेर्सेट, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा समावेश आहे.

अलीकडच्या काही दिवसांत, अमेरिकन फर्म मॉर्निंग कन्सल्टने 22 देशांमध्ये एक सर्वेक्षण केले. यावेळी जी-7 परिषदेत लोकप्रिय नसलेल्या नेत्यांची संख्या अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

अमेरिका, जपान, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आपापल्या देशातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांची लोकप्रियता कमी असल्याचा दावा केला आहे.

जर आता निवडणुका झाल्या, तर ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक हे मजूर पक्षाकडून पराभूत होतील, असे अलीकडील सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्याच वेळी, ट्रूडोच्या लिबरल पक्षाचा कॅनडात कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पराभव होईल. स्कोल्झ यांच्या पक्षाचाही पराभव होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT