ग्लोबल

पंतप्रधान मोदी इटलीला रवाना; आजपासून 5 दिवसांचा परदेश दौरा

राहुल शेळके

पंतप्रधान मोदी आजपासून 2 नोव्हेंबर दरम्यान रोम, इटली आणि ग्लासगो, यूके येथे जात आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 व्या G-20 शिखर परिषद आणि COP-26 च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी रवाना झाले. पंतप्रधान मोदी आजपासून 2 नोव्हेंबर दरम्यान रोम, इटली आणि ग्लासगो, यूके येथे जात आहेत. रोममध्ये आगमनाच्या पहिल्या दिवशी ते महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. दोन दिवसीय भेटीदरम्यान ते व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतील, असे पंतप्रधानांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर फोटो शेअर करून इटलीत होणाऱ्या जी २० परिषदेसाठी रवाना होत असल्याची माहिती दिली आहे.

"रोममध्ये, मी 16 व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहीन, जेथे मी इतर G20 नेत्यांसोबत जागतिक आर्थिक आणि आरोग्य पूर्ती, शाश्वत विकास आणि हवामान बदल यावरील चर्चेत सामील होईन," असे पंतप्रधान मोदी यांनी रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्यानंतर, पंतप्रधान मोदी त्यांचे ब्रिटिश समकक्ष बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणावरून 1 ते 2 नोव्हेंबर दरम्यान युनायटेड किंगडममधील ग्लासगो येथे जाणार आहेत. ते म्हणाले, “जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने मी इतर भागीदार देशांच्या नेत्यांनाही भेटेन आणि त्यांच्यासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेईन.

PM मोदी पुढे म्हणाले की COP26 शिखर परिषद भागीदार देशांचे नेते आणि आंतर-सरकारी संस्थांसह सर्व सदस्यांना भेटण्याची आणि भारताच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी प्रेयत्न करेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT