ग्लोबल

Modi in UN: मुलांनी बनवलेले 75 उपग्रह अंतराळात पाठवणार

विनायक होगाडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संयुक्त राष्ट्र महासभेतील ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होत आहेत. आता ते थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी या संयुक्त राष्ट्र महासभेचं सत्र करोनामुळे प्रत्यक्षात आयोजित न करता ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या महासभेत बोलणार आहेत. त्यामुळे या भाषणाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे.

  • नोबेल विजेते रविंद्रनाथ टागोरांच्या ओळींनी मी माझं भाषण थांबवतो. म्हणजेच आपल्या शुभ कर्मावर विश्वास ठेवून तू पुढे चाल, आपोआपच दुष्ट शक्ती नष्ट होतील. या ओळी संयुक्त राष्ट्रांसाठी तसेच सर्व देशांसाठी मार्गदर्शक ठरतील

  • आपले प्रयत्न नक्कीच जगाला शांततेच्या दिशेने घेऊन जातील.

  • भारताचे महान कुटनिती तज्ज्ञ चाणक्यांनी म्हणून ठेवलंय की, जेंव्हा योग्य वेळी योग्य काम केलं जात नाही तेंव्हा वेळच त्या कार्याची यशस्विता समाप्त करुन टाकतो.

  • त्यामुळेच संयुक्त राष्ट्रांना आपल्या परिणामकारकता वाढवण्याची गरज आहे. युएनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. पर्यावरण, कोरोना, दहशतवाद, अफगाणिस्तानचा प्रश्न अशा अनेक मुद्यांमुळे या शंका अधिकच वाढल्या आहेत.

  • कुणीही अफगाणचा वापर करायला नको

  • तिथल्या महिलांना, मुलांना, अल्पसंख्यांना मदतीची गरज आहे. त्यांच्या प्रती आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे

  • भारत 75 उपग्रहांना अंतराळात पाठवणार जे मुलांनी तयार केलेलं असेल

  • जे देश प्रतिगामी विचारसरणीने चालत आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की दहशतवाद त्यांच्यासाठीही धोक्याचा

  • अफगाणिस्तानच्या भुमीचा वापर दहशतवादाच्या प्रसारासाठी व्हायला नको

  • आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना उत्तरं द्यायची आहेत. जेंव्हा निर्णय घ्यायची वेळ होती ज्यांच्यावर निर्णय घ्यायची जबाबदारी होती ते काय करत होते.

  • आज जगासमोर अतिरेकी विचारसरणीचा धोका आहे. विज्ञानाधारित विवेकी विचारसरणीची जगाला आवश्यकता आहे. भारत अनुभवाधिष्टीत शिक्षणाला प्राधान्य देत आहे.

  • कोरोना महासाथीने जगाला हा देखील धडा दिला आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेला आता आणखी डायव्हर्सीफाईड करणं गरजेचं आहे. आमचं आत्मनिर्भर भारत अभियान यावरच आधारित आहे.

  • भारत जगातील एक लोकशाही आणि विश्वासू सहकारी बनत आहे.

  • इकॉनॉमी आणि इकॉलॉजीमध्ये भारताने संतुलन साधलं.

  • भारताच्या या प्रयत्नांमुळे तुम्हाला अभियान वाटेल.

  • भारताचा विकास म्हणजे जगाचा विकास आहे.

  • मी युएनजीएला ही माहिती देऊ इच्छितो की, भारताने पहिली डिएनए आधारित लस निर्माण केली आहे जी लहान मुलांना दिली जाऊ शकते. आणखी एक लस येण्याच्या तयारीत. नेझल व्हॅक्सिनही येणार.

  • जगातील गरजवंताना भारताने लस देण्यास सुरुवात केली आहे.

  • आज भारत विकासाच्या वाटेने निघाला आहे. विकास सर्वसमावेशी व्हावा, सर्वस्पर्षी आणि सर्वव्यापी, सर्वपोषक व्हावा हीच आमची प्राथमिकता.

  • गेल्या सात वर्षांमध्ये 43 कोटी नागरिकांहून अधिकांना बँक व्यवस्थेशी जोडून घेतलं

  • 36 कोटीहून अधिक लोकांना विमा कवच मिळालं ज्यांना आधी हा विचारही मनात यायचा नाही

  • 50 कोटी हून अधिक नागरिकांना आरोग्याच्या सुविधा

  • 3 कोटी कोटी पक्के घर बनवून बेघर लोकांना घर दिले

  • प्रदुषित पाणी संपूर्ण जगामधील गरिब आणि विकसनशील देशातील मोठी समस्या आहे. या समस्येला दोन हात करण्यासाठी आम्ही मोठी योजना राबवत आहोत.

सगळ्या विकासशील देश तर विशेषत: लहान डेवलपींग स्टेट्स साठी महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग एका महामारीशी लढा देत आहे. मी त्या सर्वांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. मी त्या देशाचं प्रतिनिधीत्व करतो ज्या देशाल मदर ऑफ डेमोक्रसी म्हणून ओळखलं जातं. यावर्षीच भारताने आपल्या 75 व्या वर्षांत पदार्पण केलंय. आमची विविधता हीच आमचे सामर्थ्य आहे. इथे वेगवेगळ्या भाषा, जातीधर्म आहे. हे भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. एक लहान मुलगा जो चहा विकायचा तो आता भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्रसभेसमोर भाषण करतो आहे.

गेल्या तीन टर्म गुजरातचा मुख्यमंत्री तर आता पंतप्रधान म्हणून देशवासीयांची सेवा करताना 20 वर्षे होत आहेत. मी माझ्या अनुभवावरुन सांगतो, हो लोकशाही साकारली जाऊ शकते.

  • पंतप्रधान मोदींचं संबोधन सुरु

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या हेडक्वाटर्समध्ये पोहोचले आहेत. ते थोड्याचवेळात आपलं संबोधन सुरु करतील.

  • न्यूयॉर्कमध्ये PM मोदींच्या स्वागतासाठी भारतीय लोक जमले आहेत. ते मोदींच्या येण्याची उत्साहाने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT