pm narendra modi lauds role of indian americans in strengthening india us relationships Esakal
ग्लोबल

PM Narendra Modi : अमेरिकी भारतीयांमुळे संबंधात सुधारणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतातील मुले ‘स्पायडर मॅन’ बनत आहेत, तर अमेरिकेतील युवक ‘नाटू नाटू’च्या तालावर नृत्य करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या विकासात येथील भारतीय वंशाच्या नागरिकांचा मोठा वाटा असून भारत-अमेरिका संबंध सुधारण्यातही त्यांची मोलाची भूमिका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी ‘व्हाइट हाऊस’ येथे आयोजित केलेल्या सरकारी मेजवानीवेळी त्यांनी उपस्थितांशी खुला संवाद साधला.

या सरकारी मेजवानीसाठी विविध क्षेत्रांमधील चारशेहून अधिक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी मोदी यांनी सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी, समृद्धीसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना केली. ते म्हणाले,‘‘दर दिवसागणिक भारतीय आणि अमेरिकी लोक एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेत आहेत.

आपण एकमेकांच्या नावांचा उच्चारही आता योग्य पद्धतीने करत आहोत. भारतातील मुले ‘स्पायडर मॅन’ बनत आहेत, तर अमेरिकेतील युवक ‘नाटू नाटू’च्या तालावर नृत्य करत आहेत. भारतात होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला पात्र ठरण्यासाठी अमेरिकी संघ प्रयत्न करत आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो.’’

मेजवानीच्या कार्यक्रमासाठी अत्यंत बुद्धीमान आणि कर्तृत्ववान व्यक्तींना निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानले. ‘भारत आणि अमेरिकेतील मैत्री तसेच या संबंधांमधील ऊर्जा यांचे हे सर्व जण प्रतीक आहेत.

अमेरिकेतील भारतीयांनी प्रगतीमध्ये फार मोठी झेप घेतली आहे. अमेरिकेच्या वैविध्यात त्यांनी भर घातली असून अर्थव्यवस्थेलाही बळ दिले आहे. येथील प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी छाप सोडली असून त्यांच्यामुळे दोन देशांमधील संबंध सुधारण्यास मदत झाली आहे,’ असेही मोदी म्हणाले.

मेजवानीला उपस्थित प्रमुख पाहुणे

उद्योगपती : मुकेश अंबानी (रिलायन्स), आनंद महिंद्रा (महिंद्रा अँड महिंद्रा), सुंदर पिचाई (गुगल), टिम कुक (ॲपल), इंद्रा नूयी, सत्य नाडेला (मायक्रोसॉफ्ट), शंतनु नारायण (ॲडोब)

मंत्री : उपाध्यक्षा कमला हॅरिस, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, अनेक राजदूत आणि अमेरिकी मंत्री.

बायडेन कुटुंब : हंटर बायडेन, ॲश्‍ले बायडेन, जेम्स बायडेन, नाओमी बायडेन नील.

भारतीय वंशाचे खासदार : प्रमिला जयपाल, श्री ठाणेदार, रो खन्ना, ॲमी बेरा आणि राजा कृष्णमूर्ती.

इतर पाहुणे : मार्टिन ल्युथर किंग तिसरे, टेनिसपटून बिली जीन किंग, चित्रपटनिर्माते एम. नाइट श्‍यामलन, फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, ग्रॅमी विजेते जोशुआ बेल, उद्योजक फ्रँक इस्लाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT