PM Narendra Modi
PM Narendra Modi Team eSakal
ग्लोबल

मोदी फसवतायेत की अमेरिकेकडून भेदभाव? लसीकरणावरुन नेटकऱ्यांचा सवाल

सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या तीन दिवसीय अमेरिका (USA) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्राच्या सभेला संबोधित करणार असून, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची देखील भेट घेणार आहेत. गुरुवारी सकाळी अमेरिकेत पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांचं वॉशिंग्टनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील उपस्थित होते. नरेंद्र मोदी या दौऱ्यावर असताना आता त्यांच्या लसीरणासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला खोटी माहिती दिल्याची टीका त्यांच्यावर केली जाते आहे.

मार्च महिन्यात सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन लस टोचून घेतली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली होती. मात्र अमेरिकेने कोव्हॅक्सिनला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की, अमेरिकेने कोव्हॅक्सिनला मान्यता दिलेली नसताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रवेश कसा मिळतोय.

नेटकऱ्यांनी या मुद्द्यावरुन आता नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी खरच कोव्हॅक्सिन घेतली आहे का? जर त्यांनी कोव्हॅस्किन घेतली असेल, तर त्यांना अमेरिकेत प्रवेश कसा मिळाला? नरेंद्र मोदी यांना प्रवेश देत अमेरिका भारतीयांमध्ये भेदभाव करते आहे का? असे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जाता आहेत.

अरमान नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन प्रश्न विचारला की, नरेंद्र मोदी यांनी खरचं कोव्हॅक्सिन घेतली आहे का? WHO ने मंजूर केलेली लस ज्यांनी घेतली त्यांनाच अमेरिकेने प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे आहे. जोपर्यंत ते कोविशील्ड किंवा फायझर घेत नाही तोपर्यंत मोदी अमेरिकेत प्रवास करू शकत नाही. मग मोदींनी पुन्हा भारताला मूर्ख बनवले का?

रिया नावाच्या दुसऱ्या एका ट्विटर हँडलवरुन प्रश्न विचारला गेला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतली की नाही? अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना टॅग करत, अमेरिकेचे धोरण भेदभाव करणारे असल्याचे म्हटले आहे. जर पंतप्रधान मोदी कोव्हॅक्सिन लस घेऊन अमेरिकेत प्रवेश करू शकतात, तर इतर भारतीय का करू शकत नाहीत? असा प्रश्न विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT