mehul choksi
mehul choksi 
ग्लोबल

कोरोना टेस्टनंतर मेहुल चोक्सीला रुग्णालयात केलं दाखल

सूरज यादव

नवी दिल्ली - पीएनबी बँक घोटाळा (PNB Bank Scam) प्रकरणी वाँटेड असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) डोमिनिकामध्ये सरकारी क्वारंटाइन सेंटर असलेल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मेहुल चोक्सीची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एंटिग्वातून (Antigua) बेपत्ता झाल्यानंतर तो डोमिनिकामध्ये सापडला होता. भारताने चोक्सीचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे डोमिनिकाला पाठवली आहेत. डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाने त्याला नेण्यास स्थगिती दिली आहे. या प्रकरणी दोन जून रोजी न्यायालयात सुनावणीनंतर कारवाईचा निर्णय होणार आहे. (pnb scam mehul choksi admitted hospital after covid test)

मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भारतातील तपास संस्था डोमिनिका सरकारच्या संपर्कात आहेत. चोक्सी हा मूळचा भारतीय नागरिक असून त्याच्यावर 13 हजार कोटींहून जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी त्यानं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं होतं.

भारतीय राजदूतांनी डोमिनिकाच्या सरकारला स्पष्ट सांगितलं आहे की, चोक्सी हा भारतीय नागरिक असून त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्याचे प्रत्यार्पण भारताकडे करण्यात यावे. डोमिनिकाच्या न्यायालयाने चोक्सीच्या प्रत्यार्पणाला स्थगिती दिली असून दोन जूनपर्यंत ती वाढवली आहे. उच्च न्यायालय या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार 500 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात असून भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात तो न्यायालयात गेला आहे. तर चोक्सीने 2017 मध्ये एंटिग्वाचे नागरिकत्व घेतले होते. जानेवारी 2018 च्या पहिल्या आठवड्यात तो भारतातून पळून गेल्यानंतर घोटाळा समोर आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT