मेहुल चोक्सी 
ग्लोबल

मेहुल चोक्सीविनाच परतलं भारतीय अधिकाऱ्यांचं पथक; प्रत्यार्पण पडलं लांबणीवर

विनायक होगाडे

नवी दिल्ली : मेहुल चोकसीला परत आणण्यासाठी भारताने पाठविलेले विविध एजन्सीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक कतार एअरवेजच्या खासगी विमानाने परत येत आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. चोक्सीच्या वकिलांनी डोमिनिका उच्च न्यायालयात हेबस कॉर्पस याचिका (बंदी प्रत्यक्षीकरण याचिका) दाखल केली होती. हायकोर्टाने त्यांची हेबियास कॉर्पस याचिका जुलैपर्यंत तहकूब केली आहे. (Mission Choksi Team Returns As Court Keeps Him In Dominica Till July)

मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन फरार झालेला आरोपी आहे. देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिकामध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात आणण्याच्या हेतूने भारतीय पथक डोमिनिकाला गेलं होतं. मेहुल चोक्सीचं डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच भारतातील अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकामध्ये दाखल झालं होतं. मात्र, सूत्रांच्या दिलेल्या वृत्तानुसार, हे पथक मेहुल चोक्सीशिवायच भारतात परतलं आहे.

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी डोमिनिकातील कोर्टाकडून परवानगीची आवश्यकता आहे. ती मिळाल्यास चोक्सीला आणण्यासाठी २८ मे रोजी भारतीय अधिकाऱ्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. या पथकामध्ये सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. मेहुल चोक्सीला किमान अजून महिनाभर तरी डोमिनिकातच राहावं लागणार आहे, असं चित्र आहे. सध्या पोलिसांच्या सुरक्षेत त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.

मेहुल चोक्सी सध्या अटकेत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. जोपर्यंत या दोन प्रकरणांचा निकाल लागत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणं अशक्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी व हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याचा जामीन अर्ज डोमिनिकाच्या न्यायालयात गुरुवारी फेटाळला आहे. चोक्सीने अँटिग्वाहून डोमिनिकात अवैध प्रवेश केल्याबद्दल ही सुनावणी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT