pop francis 
ग्लोबल

पोप फ्रान्सिस यांचं पुन्हा एकदा 'लाईक' घसरलं; सोशल मीडियावर चर्चेचा धुराळा

सकाळन्यूजनेटवर्क

कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस पुन्हा एकदा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मॉडेल नतालिया गॅरिबोट्टो हिचा एक बोल्ड फोटो लाईक केला होता. त्यामुळे जगभरात उलट सुलट चर्चा रंगली होती. ही चर्चा थांबण्याच्या आतच पोप फ्रान्सिस यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मॉडेल मार्गोट फॉक्स हिच्या एका सेक्सी फोटोला लाईक करण्यात आलं आहे. एका ट्विटर यूझर्सने हे समोर आणलं असून मोठ्या प्रमाणात हे ट्विट शेअर केलं जात आहे. 

ख्रिस्मसच्या पार्श्वभूमीवर लोक पोप फ्रान्सिस यांचे वार्षिक संबोधन ऐकण्यासाठी आतूर आहेत. पण, ते आता वेगळ्याच प्रांतात मुशाफिरी करताना सापडले गेले आहेत.  मॉडेल मार्गोट फॉक्स हिने एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती फीट कपड्यामध्ये आपलं अंगप्रदर्शन करत आहेत. पोप फ्रान्सिस यांनी या पोटोला लाईक केल्यानंतर फॉक्सला अत्यंत आनंद झाला. तिने यासंबंधी ट्विट करत म्हटलंय की, ''माझ्या फोटोला कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी लाईक केलं आहे, आता मी स्वर्गात जाईन.''

पोप फ्रान्सिस यांचे अकाऊंट त्यांच्या स्टाफकडून हाताळले जात असण्याची शक्यता आहे. पण, इंटरनेटच्या नजरेतून काहीही सूट शकत नाही. सोशल मीडियावर पोप फ्रान्सिस आणि त्यांनी लाईक केला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. मार्गोट फॉक्स हिचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायवेट आहे. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी या फोटोला डिस-लाईक केलंय का नाही, हे कळू शकलेलं नाही. 

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा गंभीर आरोप; भाजपनं केलं काँग्रेसला...

पोप फ्रान्सिस कोणालाही फॉलो करत नाहीत. त्यामुळे मॉडेलचे नाव सर्च करुन फोटो लाईक करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. काहींच्या मते पोप फ्रान्सिस यांचे अकाऊंट व्हेरिफाईड आहे. त्यामुळे ते कोणाला फॉलो करतात हे कळू शकत नाही. पोप फ्रान्सिस यांनी फॉक्सचा फोटो लाईक केला असो किंवा नसो, सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चघळला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT